Nojoto: Largest Storytelling Platform

जय भवानी जय शिवाजी!!! असो मुघलशाही, असो आदिलशाही,

जय भवानी जय शिवाजी!!!

असो मुघलशाही, असो आदिलशाही,
असो पोर्तुगीज, असो इंग्रज,
साऱ्यांना आणले नियंत्रणी,
मावळ्यांना एकत्र करून,रचली गनिमी कावाची नीती,
मराठ्यांच्या सरदाराने,
अशी निर्मिली हिंदवी स्वराज्याची रीती.....

असो शाहिस्तेखान, असो अफजलखान,
असो सिद्धी, असो डच,
नेस्तनाबूत झाले सारे,शत्रू झाले तारतार,
मराठ्यांच्या सरदारांनी,
अशी निर्मिली हिंदवी स्वराज्याची रीती..........

असो रामायण, असो महाभारत,
असो गीतेचे सत्यसार,
जाणले त्यांनी मर्म अपरंपार 
तुळजाईच्या आशीर्वादाने,जिजाऊंच्या प्रेरणेतून,
मराठ्यांच्या सरदाराने,अशी निर्मिली हिंदवी
स्वराज्याची रीती.........

असो पुरंदर, असो रायगड,असो सिंहगड, असो प्रतापगड,
जिंकले सारे गडावर गड,साम्राज्य केले सुरक्षित,
साकारले हिंदवी स्वराज्य,
मराठ्यांच्या सरदाराने,अशी निर्मिली हिंदवी
स्वराज्याची रीती......

©Sudha  Betageri #sudha