Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणीतले क्षण... काय दिवस होते ते... रोज तुझ्याश

आठवणीतले क्षण...

काय दिवस होते ते... 
रोज तुझ्याशी बोलणं व्हायचं,
तुला हसवण्यासाठी स्वतःचच हसू करून घ्यायचो,
तू हसल्यावर मग खळी खुलायची,
तो चेहरा मात्र मी सारखा जपायचो.

एका दिवसाचा खंडसुद्धा
आनंद नकोस करायचं,
पुढल्यादिवाशी मात्र
ते हास्य पुन्हा गालावरच दिसायचं.

तू ज्यादिवशी चिडशील,
त्या चिडण्याचे मी कारण शोधायचो,
प्रश्नांचे भडिमार केलीस कि मग,
मनोमनी मात्र उत्तरं शोधायचो.

तुझ्या दु:खातला एकेक क्षण,
मी स्वतः स्वतःशीच जगायचो,
तुझ्या हुंदक्याचा आवाज जरी आला,
तरी अश्रू मात्र मीच गाळायचो.

पण चला...
तुही इथे नाहीस, आणि तसा मीही,
हे वेडे क्षणमात्र तुझी आठवण काढत असतात,
मी मात्र नाही विचार करत,
हे स्वप्नमात्र तुलाच का ते दाखवत असतं,
पण मी नाही ते बघत,
हे डोळेसुद्धा तुझेच भास दाखवतात,
मात्र मला नाही ते दिसत.

बोलायचं तर काहीच न्हवतं,
तुला पाहण्याचा बहाणा होता तो,
लिहिलेलं तर कधीच न्हवतं,
तुला स्वतःतच शोधत होतो...

कवी : अथर्व वझे आठवणीतले क्षण
आठवणीतले क्षण...

काय दिवस होते ते... 
रोज तुझ्याशी बोलणं व्हायचं,
तुला हसवण्यासाठी स्वतःचच हसू करून घ्यायचो,
तू हसल्यावर मग खळी खुलायची,
तो चेहरा मात्र मी सारखा जपायचो.

एका दिवसाचा खंडसुद्धा
आनंद नकोस करायचं,
पुढल्यादिवाशी मात्र
ते हास्य पुन्हा गालावरच दिसायचं.

तू ज्यादिवशी चिडशील,
त्या चिडण्याचे मी कारण शोधायचो,
प्रश्नांचे भडिमार केलीस कि मग,
मनोमनी मात्र उत्तरं शोधायचो.

तुझ्या दु:खातला एकेक क्षण,
मी स्वतः स्वतःशीच जगायचो,
तुझ्या हुंदक्याचा आवाज जरी आला,
तरी अश्रू मात्र मीच गाळायचो.

पण चला...
तुही इथे नाहीस, आणि तसा मीही,
हे वेडे क्षणमात्र तुझी आठवण काढत असतात,
मी मात्र नाही विचार करत,
हे स्वप्नमात्र तुलाच का ते दाखवत असतं,
पण मी नाही ते बघत,
हे डोळेसुद्धा तुझेच भास दाखवतात,
मात्र मला नाही ते दिसत.

बोलायचं तर काहीच न्हवतं,
तुला पाहण्याचा बहाणा होता तो,
लिहिलेलं तर कधीच न्हवतं,
तुला स्वतःतच शोधत होतो...

कवी : अथर्व वझे आठवणीतले क्षण
atharv2308979139179

Atharv

New Creator