Nojoto: Largest Storytelling Platform
atharv2308979139179
  • 7Stories
  • 11Followers
  • 45Love
    0Views

Atharv

  • Popular
  • Latest
  • Video
7ae53140e0cdcda0699ffb40a01ac617

Atharv

🌹 रात काळी गुंफली 🌹

आता रात्रसुद्धा भासते,
तुझ्या आठवणींनी शोभते, 
 दुःखांच्या सरीमध्येही आता,
सुखावेसे वाटते.

अंधारल्या खोलीत माझ्या,
का धुके ही राहिली,
बोलके डोळे, आजही
बोलेनाशी वाटली.

जीवनाच्या क्षणात आज,
अंधारला राहिलो किती,
चंद्राच्या या चिंब प्रकाशी,
रात काळी गुंफली.

आजही तो दिवस यावा,
आतुरतेने वाट पाहीन,
चांदण्यात फिरतानाही,
तुझ्याकडे मी पाहत राहीन.

कवी : अथर्व वझे रात काळी गुंफली

रात काळी गुंफली #poem

7ae53140e0cdcda0699ffb40a01ac617

Atharv

बंध...

विचार केला,
विचार केला की तुला विसरावं,
तुला मनातून हटवावं,
विचार केला कि,
तुझ्या येणाऱ्या प्रत्येक विचाराला अधांतरी सोडावं,
अबोल्यातूनही बोलणारे ते शब्द,
एकांतातही असणारा तुझा सहवास,
तुझे महत्त्व सांगणारा तो एकेक श्वास,
आणि 'तू आहेस ' हे सांगणारा तो भास,
सार काही एकाक्षणी विसरून जावं.

पण नाही,
जेवढं आज मी तुला विसरतोय,
तेवढीच तू मनात रूढ होत आहेस,
तशी आत्ताही तू मला भासवत आहेस,
आज एकटा आहे मी, पण तू श्वासातही जाणवत आहेस.

कधीकधी अचानकच हसू येत,
जेव्हा आठवणसुद्धा तुझीच येते,
मग हळूच डोळ्यासमोर तो चेहरा,
अन खळी हि खुलून जाते.

भास जरी असलीस तू माझा,
तरी आजही मी तुलाच जगतो आहे,
कधी मनात, तर कधी प्रत्यक्षात,
तूला सुंदर चित्रात रेखाटतो आहे.

दुसऱ्या चेहऱ्याचा विचारसुद्धा तो,
आज माझ्याकडून होत नाही,
जणू मनालाही तूच पसंत असावीस,
हे कोड काही सुटत नाही.

जरी तुझा अबोला आहे माझ्याशी,
तरी तुझ्याशी संवाद आज होत आहे,
प्रश्न येतच नाही सामोरी असण्याचा,
कारण एकेकाळी हे मन तुझ्याशी जोडलेलं आहे.

कवी : अथर्व वझे बंध...

बंध...

7ae53140e0cdcda0699ffb40a01ac617

Atharv

बंध...

विचार केला,
विचार केला की तुला विसरावं,
तुला मनातून हटवावं,
विचार केला कि,
तुझ्या येणाऱ्या प्रत्येक विचाराला अधांतरी सोडावं,
अबोल्यातूनही बोलणारे ते शब्द,
एकांतातही असणारा तुझा सहवास,
तुझे महत्त्व सांगणारा तो एकेक श्वास,
आणि 'तू आहेस' हे सांगणारा तो भास,
सार काही एकाक्षणी विसरून जावं.

पण नाही,
जेवढं आज मी तुला विसरतोय,
तेवढीच तू मनात रूढ होत आहेस,
तशी आत्ताही तू मला भासवत आहेस,
आज एकटा आहे मी, पण तू श्वासातही जाणवत आहेस.

कधीकधी अचानकच हसू येत,
जेव्हा आठवणसुद्धा तुझीच येते,
मग हळूच डोळ्यासमोर तो चेहरा,
अन खळी हि खुलून जाते.

भास जरी असलीस तू माझा,
तरी आजही मी तुलाच जगतो आहे,
कधी मनात, तर कधी प्रत्यक्षात,
तूला सुंदर चित्रात रेखाटतो आहे.

दुसऱ्या चेहऱ्याचा विचारसुद्धा तो,
आज माझ्याकडून होत नाही,
जणू मनालाही तूच पसंत असावीस,
हे कोड काही सुटत नाही.

जरी तुझा अबोला आहे माझ्याशी,
तरी तुझ्याशी संवाद आज होत आहे,
प्रश्न येतच नाही सामोरी असण्याचा,
कारण एकेकाळी हे मन तुझ्याशी जोडलेलं आहे.

 
कवी : अथर्व वझे बंध...

बंध... #poem

7ae53140e0cdcda0699ffb40a01ac617

Atharv

अचानक आलेली आठवण...

काय दिवस होते ते... 
रोज तुझ्याशी बोलणं व्हायचं,
तुला हसवण्यासाठी स्वतःचच हसू करून घ्यायचो,
तू हसल्यावर मग खळी खुलायची,
तो चेहरा मात्र मी सारखा जपायचो.

एका दिवसाचा खंडसुद्धा
आनंद नकोस करायचं,
पुढल्यादिवाशी मात्र
ते हास्य पुन्हा गालावरच दिसायचं.

तू ज्यादिवशी चिडशील,
त्या चिडण्याचे मी कारण शोधायचो,
प्रश्नांचे भडिमार केलीस कि मग,
मनोमनी मात्र उत्तरं शोधायचो.

तुझ्या दु:खातला एकेक क्षण,
मी स्वतः स्वतःशीच जगायचो,
तुझ्या हुंदक्याचा आवाज जरी आला,
तरी अश्रू मात्र मीच गाळायचो.

पण चला...
तुही इथे नाहीस, आणि तसा मीही,
हे वेडे क्षणमात्र तुझी आठवण काढत असतात,
मी मात्र नाही विचार करत,
हे स्वप्नमात्र तुलाच का ते दाखवत असतं,
पण मी नाही ते बघत,
हे डोळेसुद्धा तुझेच भास दाखवतात,
मात्र मला नाही ते दिसत.

बोलायचं तर काहीच न्हवतं,
तुला पाहण्याचा बहाणा होता तो,
लिहिलेलं तर कधीच न्हवतं,
तुला स्वतःतच शोधत होतो...

कवी : अथर्व वझे अचानक आलेली आठवण

अचानक आलेली आठवण #poem

7ae53140e0cdcda0699ffb40a01ac617

Atharv

आज एकटा जरी मी...

आज एकटा जरूर आहे,
जरी अंधारात हरवलो मी,
एक दिवस येईल नव्याने,
जेव्हा पुरून उरेन मी...

जरी आज मी अनोळखी जगाला,
तरीही स्वतःशी ओळख आहे,
पण एकेदिवशी आतुरतील सारे,
वचन जगाला देत आहे...

आज पायरीवरती उभा असा मी,
माझे तेज काही सांगत आहे,
त्याच पायऱ्या चढून शिवेन ते क्षितिज सारे,
हा इरादा पक्का आहे...

रस्ते जरी कठीण असतील,
आज तरीही चालत आहे,
आजही नव्या वाटा शोधत,
ठसे पाऊलं उमटत आहे...

अडथळे तर येतील-जातील,
पण यशालाच प्रतिसाद दिला,
सर्व केले प्राप्त आज,
केवळ सामर्थ्याने धीर दिला...
 
चहूकडे ते यश पसरू दे,
स्वतःला कुठेही हरवू नका,
अंतरी तुमच्या खोल दडलेला,
व्यक्ती मात्र विसरू नका...

कवी : अथर्व वझे #Nature
7ae53140e0cdcda0699ffb40a01ac617

Atharv

आठवणीतले क्षण...

काय दिवस होते ते... 
रोज तुझ्याशी बोलणं व्हायचं,
तुला हसवण्यासाठी स्वतःचच हसू करून घ्यायचो,
तू हसल्यावर मग खळी खुलायची,
तो चेहरा मात्र मी सारखा जपायचो.

एका दिवसाचा खंडसुद्धा
आनंद नकोस करायचं,
पुढल्यादिवाशी मात्र
ते हास्य पुन्हा गालावरच दिसायचं.

तू ज्यादिवशी चिडशील,
त्या चिडण्याचे मी कारण शोधायचो,
प्रश्नांचे भडिमार केलीस कि मग,
मनोमनी मात्र उत्तरं शोधायचो.

तुझ्या दु:खातला एकेक क्षण,
मी स्वतः स्वतःशीच जगायचो,
तुझ्या हुंदक्याचा आवाज जरी आला,
तरी अश्रू मात्र मीच गाळायचो.

पण चला...
तुही इथे नाहीस, आणि तसा मीही,
हे वेडे क्षणमात्र तुझी आठवण काढत असतात,
मी मात्र नाही विचार करत,
हे स्वप्नमात्र तुलाच का ते दाखवत असतं,
पण मी नाही ते बघत,
हे डोळेसुद्धा तुझेच भास दाखवतात,
मात्र मला नाही ते दिसत.

बोलायचं तर काहीच न्हवतं,
तुला पाहण्याचा बहाणा होता तो,
लिहिलेलं तर कधीच न्हवतं,
तुला स्वतःतच शोधत होतो...

कवी : अथर्व वझे आठवणीतले क्षण

आठवणीतले क्षण #poem

7ae53140e0cdcda0699ffb40a01ac617

Atharv

एक अनोखी सांज...

एक वेगळीच परिस्थिती होती आज,
जराशी अजाण तर जराशी अबोलच होती सांज,
भविष्याचा विचार होता चालू,
पण पाण्यातच ते तोंड होत, 
त्यामुळे स्वतःचाच येत न्हवता आवाज.

मग एक विचार मनात उमटला,
मग एकच आवाज कानी पडला,
घुसमटलेल्या त्या मनाचे,
तो सहजच वारे बदलून गेला.

तो विचार होता नेहमीचाच,
पण ओळख सारी बदलून गेला,
घुसमटलेल्या त्या मनाचे,
तो सहजच वारे बदलून गेला.

मात्र तो विचार होता कुणाचा ?
तो विचार होता एका सुंदर चेहऱ्याचा,
जो सतत काही बोलत होता,
कळत-नकळतच कि म्हणा,
वारे मात्र बदलत होता.

खूप दिवसांनी का होईना,
सांज आज आपलीशी वाटत होती,
त्यात तिचीच सर होती,
आणि सतत तीच भासवत होती.

शांत अश्या त्या वातावरणात,
आवाज मात्र तुझाच होता,
नाजूक असलेल्या त्या प्रेमाचे,
वारे मात्र बदलत होता...

कवी : अथर्व वझे एक अनोखी सांज

एक अनोखी सांज #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile