साऱ्यांच्याच मनाला भासे लेकीचा गारवा तिच्या स्वभावातून वाहे नित्य अमृताचा गोडवा लेकीचा गोडवा सदा दरवळावा अन लेकीसाठी बाप शोधे विसावा जगण्यास बळ देई जणू नक्षत्र की परी भुर्रकण उडून जाईन कुण्या परक्यांच्या घरी लेक जाई जरी सासरी तरी मन असे बापाच्याच घरी तिच्या जन्माच्या रडगाणी वाजे बापाच्या अंतरी खूपदा दुखते तिचे ही काळीज तरी हास्य हेच उपाय लेक बनते कधी कधी स्वतःच्या बापाचीच माय लेकीचा गोडवा सदा दरवळावा अन लेकीसाठी बाप शोधे विसावा हे ईश्वरा माझ्या लेकीला लाभो संसार सुखाचे अतूट राहो नाते सर्व बापा लेकींचे लेखन:- आशिष गंगाधरजी चोले बापलेकी