Nojoto: Largest Storytelling Platform
coronavirus6709
  • 43Stories
  • 8Followers
  • 389Love
    0Views

आशिष गंगाधरजी चोले

  • Popular
  • Latest
  • Video
f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

सांगू काय वर्णू काय तो आनंद
जेव्हा मनी येते विचार ३ एप्रिल जुमदेव जयंतीचे
भान सारे विसरून जाते 
३एप्रिल ला जयंती येता महानत्यागीची

करूया गजर जूमदेव नामाचा
आहे जयंती सोहळा महानत्यागीचा

बाबा हनुमानजी बाबा जूमदेवजी प्रणामाने रॅली होते सुरुवात
टिमकी ते वर्धमान नगर वाजून गाजवून उल्हास सेवकांत
बाबांचा रथ जेव्हा टिमकी मधून निघते
रॅली च्या तालावर पाय साऱ्यांचे थिरकते

करूया गजर जूमदेव नामाचा
आहे जयंती सोहळा महानत्यागीचा

सेवक सारे बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी गजरात रंगते
बाबांच्या जय जयकाराने नागपूर नगरी दुमदुमून जाते
 जुमदेवजी माझे सदैव हसतमुख
त्यांच्या मार्गी सेवक सारे समसमान

येथे जादूटोणा ,दुःख,सारे भय पळते
तत्व शब्द नियम सेवकांच्या जीवनाचे सार्थक करते

करूया गजर जूमदेव नामाचा
आहे जयंती सोहळा महानत्यागीचा

लेखन:- आशिष गंगाधरजी चोले
मु पो रेवराळ तह मौदा जी नागपूर.

©आशिष गंगाधरजी चोले जुमदेवजी जयंती

जुमदेवजी जयंती #मराठीकविता

13 Love

f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

माझ्यावर कविता कर माझ्यावर कविता कर म्हणणाऱ्या बहिणीचा आज वाढदिवस 

आमच्या केसांना घट्ट हात लावून स्वतःच्या केसांना लावत अरे तुझ्या डोक्यातला जास्तीचा तेल मी माझ्या केसांना लावली म्हणत खोबऱ्याचा तेल चोरणारी 

लहानपणी भांडण झाल्यावर तुले मी तेवा अर्धा चॉकलेट 
देलतो न तो माया चॉकलेट आत वापस कर म्हणणारी 
शाळेमध्ये लेफ्ट राईट चालत बॉस नावाने  प्रसिद्ध असणारी 

माझा वाढदिवस आहे गिफ्ट आंनजो अस एक वर्षापासून गिफ्ट गिफ्ट करणारी

 


एक अशी पोझ काढ,एक इकडून फोटो काढ,एक तिकडून फोटो काढ, सेल्फी कॅमेरा ने फोटो काढ,काढल्यावर हट गा तुले फोटोच नाई काढता येत
अशी जेव्हा तेव्हा फोटो साठी मर मर करणारी 

खाण्यामध्ये एक नंबरची खादाड , तूया घरी हवन आहे न त मले जेवाले बोलवजो, तुया लग्नाले तेल माती पासून जेवाले बोलवजो अशी सगळ्यांचे टिफीन एकटीच घेऊन बसणारी 

पाय गोल्या तुया लग्नाले मले कपडे घेऊन देजो नाही त तू पाहून घेजो बापू असे म्हणणारी 

बोलण्यात कुणालाही न घाबरणारी एक नंबरची बेडर, बेफिकर, बोलता बोलता पटपट समोरच्याला झापणारी
एक नंबरची उद्धट बोलणारी 

मनाने साफ,एक नंबरची कंजूस,शिव्या देण्यात phd झालेली,लहान लहान जोक वर,गावातील झालेले कांड आठवू आठवू खळखळून हसणारी 

चुकून तिला काही म्हंटले तर तू भेट मले मग सांगतो  तूले असे म्हणणारी दबंग मोनी लां HAPPY WALA BIRTHDAY

©आशिष गंगाधरजी चोले

0 Love

f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

बाबा 
बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात !
असंख्य वेदना  होतात माझ्या काळजात !
का म्हनून  गेले तुमच्या लेकरास सोडून बाबा तुम्ही दूर !
 या परक्या जगात मला नाही कुणाकडूनही धीर !
बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात !
असंख्य वेदना  होते माझ्या काळजात!!

 तुमच्या जाण्याची पोकळी कुणी भरू शकत नाही !
 अन माझी आई पन  बाबा पेक्षा मेहनतीत कमी नाही !
कसा  विसरु बाबा तुमच लाभलेलं इवलंसं प्रेम  !
आता माझी इकच इच्छा की मि पन होनार !
माझ्या बाबांसारखा सारखा सेम टू सेम !
बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात !
असंख्य वेदना  होते माझ्या काळजात !!

लेखन:- कोमल श्रीराम बंसोड

©आशिष गंगाधरजी चोले #foryoupapa
f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

अब हो जा सतर्क ये बाशिंदे 
अब हो जा सतर्क ये बाशिंदे
कि जाग रहा है हिंदुस्तान,
कसम खायी इसने भी कि न मिले किसी असुर को वरदान ,
ये राम की है कृष्ण की है ,
ये राम की है कृष्ण की है 
कि गौतम और महावीर की ,गुरूगोविन्द और पैगंबर कि है ,
महादेव के तांडव की है, की है ये प्रेम और आदर्शो की ये भूमी ,
अब जाग रहा है हिंदुस्तान , मत ललकार 
अब जाग रहा है हिंदुस्तान , मत ललकार 
अरे मत ललकार तू वरना हो जाएगा बेकार 
की हिंदुस्तान जाग रहा है,
वीर शिवाजी ,या राणा प्रताप अब नही रहे सिर्फ किताबो में ।।,
वीर शिवाजी ,या राणा प्रताप अब नही रहे सिर्फ किताबो में 
की हिंदुस्तान जाग रहा है,
वीर भगतसिंह और विवेकानंद पल रहे हर गलियारों में , तू अब मत ललकार की हिंदुस्तान जाग रहा है ।

      कोई गलती हुई हो लिखने में तो माफ करना दोस्तो अभी ही रचा हु इन पंक्तियों को 

कोमल श्रीराम बंसोड

©आशिष गंगाधरजी चोले #alone

7 Love

f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

आई बाबां प्रमाणेच शिक्षक असतात श्रेष्ठ
विद्यार्थ्यांना विद्येची महती सांगतात होऊनि एकनिष्ठ
फसवेगिरी-लबाडी यांपासून ठेवूनि दूर शिकवितात करण्यास कष्ट
हेचि असतात शिक्षक जे करतात समाजातून अज्ञान नष्ट

शिक्षक म्हणजेच आई वडिलां नंतरचे प्रथम गुरू असतात
शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय दुसरे नसतात
कुंभारापरी मातीच्या गोळ्याप्रमाणे आकार देऊनि विद्यार्थी घडवतात
हेचि असतात शिक्षक जे शिष्यांची साकार स्वप्न करतात

खर-खोटं, चांगलं-वाईट,यांचं शिक्षण शिक्षकच देतात
समाजाचा आरसा विद्यार्थ्यांस शाळेतूनच दाखवतात
सर्व विद्यार्थी एकसमान याच व्रत ते पाळतात
पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकापर्यंत एकसमान नजर आपली ठेवतात

अभ्यासात हलगर्जी, खोडकरपणामुळेच विद्यार्थ्यांस शिक्षा देतात
विद्यार्थ्यांस रडतांना कोमेजलेले बघून मायेने कुरवाळून जवळ पण लगेच घेतात
शिक्षा दिली म्हणून मनात स्वतःच दुखावतात
पण शिक्षेच्या भीतिनेच विद्यार्थी परीक्षेत अव्वल येतात

शिक्षकांमुळेच उज्वल सर्व शिष्यांची भवितव्य
शिक्षकच नाहीत तर मातीमोल विद्यार्थ्यांचे भविष्य
शिक्षकांशिवाय अर्थ नाही विद्यार्थ्यांच्या जीवनी
शिक्षकांच्या परिश्रमाने च सुंदर आकार घेतो विद्यार्थ्यांचे आयुष्य.

लेखन:-आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले
  Teacher day
#reading

Teacher day #reading

10 Love

f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

गमतीमध्ये नेल्या आपण सर्व गोष्टी,
कुठलाही विचार न करता केल्या सर्व गोष्टी
निसर्गाशी खेळून जीव घातला धोक्यात, 
मानवानेच मानवाचा जीव आणला गोत्यात
-------******-----
गैरवापर केला आपण आधी पाण्याचा,
विचार नाही केला कधी पुढच्या पिढीचा
काय होणार काय होते असे आपण बोललो,
निसर्गाचा मार पडला अन ढसा ढसा रडलो
-------******-----
तेव्हाच ठरवायच होत मनी,
विनाकारण उधळायच नव्हते जास्त पाणी,
तेव्हा जरी काटकसर केली असत आपण,
तर आज विकत घ्यावं असलं नसत पाणी
-------******-----
या नंतर निसर्गाने शहाण्यांवर वार केला,
पाण्या नंतर आता हवेचा ताबा गेला
मिळत होती आधी हवा फुकटात,
पैशे देऊनही आता मिळेना ऑक्सिजन  विकत
-------******-----
निसर्गाच्या सानिध्याला आधी जपलं असतं,
निसर्गाने आपल्याला आता तारलं असत
निसर्गाला स्वच्छ ठेऊन झाडे लावले असते
हवा पाणी निसर्गाने मोफत दिले असते
-------******-----
म्हणून म्हणतो गाड्यांनो आता तरी जागे व्हा, 
निसर्गातील सानिध्याला आता तरी जपा
झाडे लावा झाडे जगवा फक्त नारा नाका लावू,
आचरणात आणू आणि आपण झाडे लावू.
लेखन:- धम्मा गजभिये

©आशिष गंगाधरजी चोले #Corona_Lockdown_Rush
f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

प्यारे दोस्त  किती बेईमान निघाला ना तू दादा
सहजरित्या आम्हांस सोडून गेला रे तू.
किमान लेकराचा तरी विचार करायचा होतास रे 
सूद यायच्या आधीच त्याचा बाप हिरावलास. 

आमच्या पेक्षा मोठा होता ना रे तू वयाने दादा
मग तु मोठ्या भावाची जबाबदारी पार न पाडताच 
सहजरित्या आम्हांस सोडून गेला रे तू
किमान बाबांचा तरी विचार करायचा होतास रे
या वृद्ध वयात त्यांचा आधार च निराधार केलास 

तुझे सगळे रुसवे , फुगवे सहन करायचो न आम्ही
तरीही आमच्याशीच का रे हा अबोला
सहजरित्या आम्हांस सोडून गेला रे तू
किमान भावांचा तरी विचार करायचा होतास रे
सगळ्या भावंडांचा मनोबल च हिसकावलास 

तुझ्या चिडण्यातील प्रेम,रागावण्यातून आपलेपणाची साद,
सगळंच तर मान्य होते ना आम्हाला
सहजरित्या आम्हांस सोडून गेला रे तू
किमान वहिणींचा तरी विचार करायचा होतास रे
जिचे जगणेच तुझ्यापासून सुरू तिचा कुंकूच पुसलास 

किती बेईमान निघाला ना तू दादा
सहजरित्या आम्हांस सोडून गेला रे तू.

©आशिष गंगाधरजी चोले

12 Love

f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

हे पाप पुण्याचे घडे येथे -दिसले का कधी कुणाला
ओंजळ सदा रिकामी माणुसकीची-भरण्यात उभा आयुष्य गेला
मागे सदा सुखाच्या - पळण्यातच  अख्खा आयुष्य गेला
कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष गेला 

काय परिस्थिती मनाची -कधीच उमजले नाही मजला
नाते रक्त संबंधाचे जपण्यात उभा आयुष्य गेला
हे बंध रक्त नात्याचे कशा परी अन किती जपावे
जपतांनाही नाते सारे -दोषपात्रास आम्हालाच अग्रेअर करावे 

आयुष्य म्हणजेच - सुटता न सुटणारे कोडे
दुःख किती न सहवे- डोळ्यातच आटतात आसवे
वाटेवर चालतांना आयुष्याच्या - जगणे मात्र नाम मात्र च असावे
याच्या त्याच्या सर्वांसाठी करून -मरावे परी कीर्ती रूपे उरावे 

रंजल्या गांजल्या करून मदत-अश्रू आपले आपणच पुसावे
इथे कुणीच नाही कुणाचे-लोक काय म्हणतील जगाचे 

व्यर्थ सारे हे प्रयत्न- नामधारी ही माणुसकी
माणुसकी ही जगाची-कळण्यातच उभा आयुष्य गेला 

मागे सदा सुखाच्या - पळण्यातच  अख्खा आयुष्य गेला
कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष्य गेला 
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले जपण्यात आयुष्य गेला
#ZeroDiscrimination

जपण्यात आयुष्य गेला #ZeroDiscrimination

10 Love

f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

धर्मविर संभाजी 

अंधाऱ्या राती हा सुर्यासम लखलखला
सईबाईच्या पोटी स्वराज्याचा धाकला धनी जन्मला 

असा हा पुरंदर चा धुरंधर जगी शोभला
शिवबाचा विरंधर रयतेचा दुसरा छत्रपती जाहला 

जिजाऊ च्या शिवबाचा शूरवीर असा धर्मवीर छावा
औरंग्या झोपेतही घाबरे पाहुनी भगवा ल्हावा 

चौदाव्या वर्षीच बुधभूषण लिहुनी बनला विद्वतेचा महाधनी
घेऊनि मूठभर मावळे आपुला सर्जा उडवि धुरळा रणांगणी 

स्वराज्य राखले लढून न कधीच हरला
ज्वलंत घेतला वसा न मातीलाच वाहिला 

स्वराज्य रक्षणास अहो दिवस रात झटला
निडर पराक्रमी शंभू राजांनी जित्ता वाघ उभा फाडला 

विश्वासघाताने धर्मवीर बंदिस्त केला
कडाडल्या विजाही जेव्हा स्वतंत्र सूर्य पिंजऱ्यात कोंडला 

फोडले नयने छाटली वाणी कापला धिप्पाड अंग
कासावीस झाली धरती ही घेऊन अंगावर रक्ताचा लाल रंग 

पाहुनी मरणयातना सूर्य नभिचा खोळंबला
पराक्रमी संभाजी राजांसमोर यमराज नतमस्तकला 

अनंत अत्याचाराने काळ ही ताटकळला
मरणं समोर असतांनाही ना शत्रू समोर झुकला 

मोडेन पण वाकणार नाही असा सह्याद्रीचा वाघ गरजला
प्राण शरीरातून सोडून ही राजा आमुचा जित्ता च राहिला
                                  राजा आमुचा जित्ता च राहिला
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले

9 Love

f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

साऱ्यांच्याच मनाला भासे लेकीचा गारवा
   तिच्या स्वभावातून वाहे नित्य अमृताचा गोडवा
लेकीचा गोडवा सदा दरवळावा

तिच्या जन्माच्या रडगाणी वाजे बापाच्या अंतरी
जगण्यास बळ देई जणू नक्षत्र की परी.

©आशिष गंगाधरजी चोले

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile