Nojoto: Largest Storytelling Platform

भविष्यवेधी शिक्षण पहिल्यांदाच शुभेच्छा संदेशाची

भविष्यवेधी शिक्षण 

पहिल्यांदाच शुभेच्छा संदेशाची 
याची आम्ही वाजवली रिंग    
समजावे लागले मेटाकॉग्निशनची 
थिंकिंग अबाउट थिंकिंग....
        आनंद आणि समाधान लपला आहे
        स्वयं प्रेरणेच्या कुशीत
        उत्तम असा माणूस घडतो 
        वेध ग्रूपच्या मुशीत.....
जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण 
घेऊन आम्ही जगणार आहोत
सिक्स सी च्या बिया घेऊन
मातीत आम्ही रुजवनार आहोत.....
        स्वतःच्या खांद्यावर महाधनुष्य पेलण्याची
        दिली स्वपातळीने हिंमत 
        दुसऱ्याकडे बोट न दाखवता
        कळली आम्हला आमची किंमत .......
ASAR, NAS आणि PISA
हा आहे कौशल्याचा संग्राम
शिक्षण देतो म्हणजे काय?
त्यातून शिकलो चार आयाम.....
        आव्हान हा तर भविष्यवेधी
        शिक्षणाचा आहे प्रमुख गाभा 
        प्रत्येक मूल घेईल उंच झेप 
        हा विषयमित्राचा वादा.....
करूया निरागस मुलांच्या 
जिज्ञासू वृत्तीचा सन्मान
शिकण्यासाठी वापरू छानस 
आधुनिक तंत्रज्ञान....
          जी मुले वाढवतील
          स्वतःची अध्ययनाची रेस 
          घेऊया गोंडस चेहऱ्याची
          सेल्फी विथ सक्सेस ...

©Keshav
  भविष्यवेधी शिक्षण
keshavpatilwasri6715

Keshav

New Creator

भविष्यवेधी शिक्षण #Thoughts

36 Views