Nojoto: Largest Storytelling Platform

तिळगुळ जेव्हा आमचा बांध सुटला तेव्हा संवाद आमचा शा

तिळगुळ
जेव्हा आमचा बांध सुटला
तेव्हा संवाद आमचा शांत होता
माणसामध्ये मिसळून सुद्धा
दाट गर्दीत एकांत होता

सुख समृद्धीने जेव्हा भरले
या स्वार्थी मनाचे जीवन
जीवनात खऱ्या वैभवाचा
जाणवला आकांत होता

मी जे जे शोधले जगण्यात
वगळुनी प्रत्येक माणसाला
तो विठ्ठल माझा तेव्हा
दडला लोकांत होता

तिळासवे मानावे दुःख 
अन सुख हे गुळासारखे
तो मंत्र जीवनाचा कुठे
भिनला अंगात होता

या जुळवू पुन्हा ती
हरवलेली गोड नाती
तुमच्या शिवाय साजरा
कुठे आमचा संक्रांत होता
रचनाकार,
©सुरेश गोविंद पवार #संक्रात
तिळगुळ
जेव्हा आमचा बांध सुटला
तेव्हा संवाद आमचा शांत होता
माणसामध्ये मिसळून सुद्धा
दाट गर्दीत एकांत होता

सुख समृद्धीने जेव्हा भरले
या स्वार्थी मनाचे जीवन
जीवनात खऱ्या वैभवाचा
जाणवला आकांत होता

मी जे जे शोधले जगण्यात
वगळुनी प्रत्येक माणसाला
तो विठ्ठल माझा तेव्हा
दडला लोकांत होता

तिळासवे मानावे दुःख 
अन सुख हे गुळासारखे
तो मंत्र जीवनाचा कुठे
भिनला अंगात होता

या जुळवू पुन्हा ती
हरवलेली गोड नाती
तुमच्या शिवाय साजरा
कुठे आमचा संक्रांत होता
रचनाकार,
©सुरेश गोविंद पवार #संक्रात