Nojoto: Largest Storytelling Platform

माहेर..... ------------------------- माहेरी तू आल

माहेर.....
-------------------------

माहेरी तू आल्यावर
तुझे हासने वेगळे,
तुझ्या हासण्याची भाषा
आई बाबांनाच कळे............

                 साठवणीच्या ग गोष्टी
                 पुन्हा पुन्हा आठवती,
                 माहेर घरात लेक
                 छान मौल्यवान मोती............

झाडं,वेली हासतील
ओढ लावून मायेची,
माहेरवाशीण आली
लेक लाडकी घराची.............

                 दिन आनंदी आनंद
                 थवा खेळतो पक्षांचा,
                 लेक अंगणात येता
                 डोळा बोलतो बाबांचा............

गाय गोट्यातून बोले
मोठी हंबर काढून,
सय आहे जुनी मज
सुख वाटले पाहून.............

                 जाई ,जुई ,फुललेली
                 भारी आबुली हासते,
                 लेक गजरा माळून 
                 आज घर जागवते............

अवती भवती डोळा
अश्रू  अश्रू  ओंघळती,
वेण्या घालता घालता
घट्ट बांधलेली नाती............

                 लेक माहेरवाशीण
                 आली परकी होऊन,
                 सुख दुःखाच्या गाठी
                 जाते पदरी लपून............

लेक परक्याच सुख
ओढ माहेर घराची,
क्षण आनंद देऊन
वाट पाहे सासरची............

                येई माहेरी धावत
               ओढ लागता बाबांची,
                सय काढून रडते
                जाई जुई, आबुलीची...........

सुख  पाहून सासरी
मन धावत माहेरी,
थकलेत आई-बाबा
आजी घरात म्हातारी............

------------------------------------
विठूपुत्र - श्री.अविनाश लाड,
राजापूर-हसोळ महेर..
माहेर.....
-------------------------

माहेरी तू आल्यावर
तुझे हासने वेगळे,
तुझ्या हासण्याची भाषा
आई बाबांनाच कळे............

                 साठवणीच्या ग गोष्टी
                 पुन्हा पुन्हा आठवती,
                 माहेर घरात लेक
                 छान मौल्यवान मोती............

झाडं,वेली हासतील
ओढ लावून मायेची,
माहेरवाशीण आली
लेक लाडकी घराची.............

                 दिन आनंदी आनंद
                 थवा खेळतो पक्षांचा,
                 लेक अंगणात येता
                 डोळा बोलतो बाबांचा............

गाय गोट्यातून बोले
मोठी हंबर काढून,
सय आहे जुनी मज
सुख वाटले पाहून.............

                 जाई ,जुई ,फुललेली
                 भारी आबुली हासते,
                 लेक गजरा माळून 
                 आज घर जागवते............

अवती भवती डोळा
अश्रू  अश्रू  ओंघळती,
वेण्या घालता घालता
घट्ट बांधलेली नाती............

                 लेक माहेरवाशीण
                 आली परकी होऊन,
                 सुख दुःखाच्या गाठी
                 जाते पदरी लपून............

लेक परक्याच सुख
ओढ माहेर घराची,
क्षण आनंद देऊन
वाट पाहे सासरची............

                येई माहेरी धावत
               ओढ लागता बाबांची,
                सय काढून रडते
                जाई जुई, आबुलीची...........

सुख  पाहून सासरी
मन धावत माहेरी,
थकलेत आई-बाबा
आजी घरात म्हातारी............

------------------------------------
विठूपुत्र - श्री.अविनाश लाड,
राजापूर-हसोळ महेर..
avinashlad4153

Avinash lad

New Creator

महेर.. #poem