Nojoto: Largest Storytelling Platform

न कळले काही वाट चालताना.. पावले अडखळली अनोळखी ठेचा

न कळले काही वाट चालताना..
पावले अडखळली अनोळखी ठेचांना..
ह्रुदयात दडलेले स्वप्न न कळले चालताना..
चुकलेली ती वळणे मजला घेऊनी
 आली संपलेल्या रस्त्याना..
माघारीची दारे विरली दाट भावनेच्या रानानी,
आशेच्या हिंदोळ्यावर अपेक्षांचे वारे घुमे भेफामी..
असता सोबत सकळिक, म्हणुनी जरी तरले..
दाट धुक्यात हरवलेलं भविष्य डोळ्यांना दिसे...
अंधारात जळे जरी तरी  चेहर्यावरी हसणे 
मला ललकरले तरी मी शांत किनाऱ्यावर बसणे..
हे वादळ आहे मनातले बाहेर नाही याची शक्ती..
संपून या संकटाना वाट शोधावयाची आहे नवी...
पडलो जरी दिशाहीन समुद्रात तरी 
चिरून टाकीन अशी आपुली लाट नवी... 
उफाळून घेईल  भरारी अशी ही उमेद आपली...
भिडणार त्या आसमंताला ना अडवतील 
त्या कोणत्या भिंती....

 :- ओमप्रकाश नवी वाट