Nojoto: Largest Storytelling Platform
omprakashpanchal6227
  • 8Stories
  • 41Followers
  • 44Love
    281Views

omprakash panchal

Marathi poet

  • Popular
  • Latest
  • Video
a2028c5f50c3ebc9205d71a7a2cd606d

omprakash panchal


नको तिची आठवण आता
हृदयाला खूप त्रास झालं आहे

तू असताना आणि नसताना सुधा
आसवांत हा भिजला आहे

तू असताना गमवण्याच भीतीनं
आणि गेल्यास विरहात जळला आहे

नको तिची आठवण आता
हे मन पण बेरंग झाला आहे

कोणावर प्रेम करण्यास आता
माझं निरास झाला आहे

सुंदर गोष्टींमध्ये इतके जीवघेणा त्रास
आज पहिल्यांदा अनुभवत आहे
फुलांमध्ये काटे देऊन जणू देवाने हाच संदेश दिला आहे

नको आता तिची ती आठवण
होऊ दे आता विस्मरण

तडपलेल्या अन् व्याकूळ जीवाची वेदना
तिला नाही थोडी सुधा माझ्या मनाची व्यथा

हसवताना आनंदात ठेवण्याचं विचार केला खूप
रडवताना मात्र सहजच केला खून..

अस का करून गेली ती.
प्रेमाच्या आड स्वार्थ साधून गेली ती
स्वतः च आनंद झोळी भरून  घेतला.
माझ्या वाटेला मात्र दुःखच सागर दिधला..

आज सावरत आहे तुझ्या विना हे
हे खर की आता कोण सोबत  प्रेम नाही होणार
इतकं दगड हृदय करून गेलीस..
की माझं च काय कोणाच्या आयुष्यात तूच काय 
मी पण आता सुख नाही देऊ शकणार.. 
ना त्या प्रेमळ नजरेने बघू शकणार..

~ ओम

©omprakash panchal
  #कविता #मराठीप्रेमकविता  #विरह #मराठीकविता  #मराठीप्रेम #मराठी_quote #प्रेम #Broken💔Heart i #नको

कविता मराठीप्रेमकविता विरह मराठीकविता मराठीप्रेम मराठी_quote प्रेम Broken💔Heart i नको

67 Views

a2028c5f50c3ebc9205d71a7a2cd606d

omprakash panchal

खूप दिवस झाले
काळजात एक अनामिक भीती दाटलेली

कधी कोणाकडे बघून काळजी दाटून येते
कधी कोणाचं एकूण जीव चिंतेत पडने

कोणाला सांगू कळत नाही..
कारण मलाच काही उमजत नाही..

काही तरी वेगळ होणार असे वाटते..
तर कधी काही सुटणार तर नाही असे भासते..

चालत चालत अचानक तीव्र उन्हाचा तडाका बसावं तसा काही काळजीच धस होऊन जाते ..

काही तरी आहे जे कळत पण ..
वळून मला वळून मला घेऊ वाटतं नाही..

उद्या  दिवस काय असतील हे माहीत नाही
काहीच कळत नाही का

©omprakash panchal
  #मराठीकविता  #मराठीप्रेम #मराठीविचार #मराठीशायरी #कविता #कविताप्रेमी♥️ कविता #का_कळत_नाही.

मराठीकविता मराठीप्रेम मराठीविचार मराठीशायरी कविता कविताप्रेमी♥️ कविता का_कळत_नाही.

66 Views

a2028c5f50c3ebc9205d71a7a2cd606d

omprakash panchal

न कळले काही वाट चालताना..
पावले अडखळली अनोळखी ठेचांना..
ह्रुदयात दडलेले स्वप्न न कळले चालताना..
चुकलेली ती वळणे मजला घेऊनी
 आली संपलेल्या रस्त्याना..
माघारीची दारे विरली दाट भावनेच्या रानानी,
आशेच्या हिंदोळ्यावर अपेक्षांचे वारे घुमे भेफामी..
असता सोबत सकळिक, म्हणुनी जरी तरले..
दाट धुक्यात हरवलेलं भविष्य डोळ्यांना दिसे...
अंधारात जळे जरी तरी  चेहर्यावरी हसणे 
मला ललकरले तरी मी शांत किनाऱ्यावर बसणे..
हे वादळ आहे मनातले बाहेर नाही याची शक्ती..
संपून या संकटाना वाट शोधावयाची आहे नवी...
पडलो जरी दिशाहीन समुद्रात तरी 
चिरून टाकीन अशी आपुली लाट नवी... 
उफाळून घेईल  भरारी अशी ही उमेद आपली...
भिडणार त्या आसमंताला ना अडवतील 
त्या कोणत्या भिंती....

 :- ओमप्रकाश नवी वाट

नवी वाट #poem

5 Love

a2028c5f50c3ebc9205d71a7a2cd606d

omprakash panchal

या जन्मात विसरणार नाही त्या गोष्टी आपल्या सोबतच संपणार नाहीत याची जाणीव प्रत्येक माणसास असायला हवी.... 

अनुभवलेले ते गोड किरणे आपल्या सोबतच दृष्टीआड होणार नाहीत याची,काळजी प्रत्येकाने घ्यावी..

असतो एक एक जण खास करून त्याची जाणीव, शब्दांचे मोती बनून शिंपल्यात जपावी...

 जणू जमिनीवर पडलेले फुलं देखील सुगंध देऊन जा तील , त्यांचेही कोणासोबत तर सोबत घालवलेले गोड क्षण, कोणाला तर आधार देऊन जातील..

तसे आपले आयुष्य ही कोणाला तरी अर्पण करण्यास फक्त शब्दही पुरेसे होतील..
पण भावनेचे पुष्गुच्छ लेखनात गुंफूले तर, त्याची उत्तम भेट एकाद्यास देऊन जातील...

एकट्या वाटणे जाणारे कधी जेंव्हा हे पान उघडून बघतील, तेंव्हा तयांना त्यात कोणाचे तरी प्रतिबिंब दिसून येतील.....

हसवेल अथवा हळवे करतील मने पण एकमेकांच्या गोष्टी, आपलेसे वाटतील काही... काही उलगडेल अथवा उमजून जाईल .. न जाणे कोणास नवा उत्साह देतील... 
एकमेकांचे दुःख एकमेकांचे सुख जुळून येतील, नव्या बंधनाचे सुर छेडा तुम्ही साद घालीत दुसरे सुर सृष्टी मधूनी तुम्हास येऊन मिळतील..... आपले सुर विरणार नाहीत

आपले सुर विरणार नाहीत

3 Love

a2028c5f50c3ebc9205d71a7a2cd606d

omprakash panchal

सगळ काही कळत होत
पण वळत मात्र काहीच नव्हतं
माझ्या मनात घर प्रितीच बणतच होत
तीन खूप मनले नाही होणार आपल त्यात एकत्र राहणे
नाही जमणार प्रितीचे कळी खुलवणे
नको करू प्रयत्न बांधण्याचे घरटे
 उडून जावे लागणार एक दिवस जेंव्हा  घेरतील नात्यांचे जाळे..
मग काय उपयोग सजवून स्वप्नांचे घरटे..
सांगयच होत तिला तुझ्या असण्याने होईल ते घरटे
चिरंजीव सदैव अंतरी माझ्या 
तुझ्या बागडण्याने दरवळेल सुगंधी दर्प प्रेमाचा 
नसशील तू नसेन मी त्यात पन राहील ते घर खुललेले
आुष्यभर ह्रुदयात खोल  दोघांच्या

🚩:- ( ओमप्रकाश पांचाळ ) 🚩 #_घरटे तुझे नी माझे

#_घरटे तुझे नी माझे

6 Love

a2028c5f50c3ebc9205d71a7a2cd606d

omprakash panchal

ढग निघून चालले तसे दिवस ही चालले
मेघा सोबत ते बरसून जातात,सोबत पाऊस देऊन जातात..
एक एक दिवस नवी स्वप्ने घेऊन येतो..
सोबत काही अनुभव देऊन जातो..
बरसणाऱ्या ढगांना, जाणाऱ्या दिवसांना 
कोण बर थांबवणार,..
आता ही नवीन वाट जीवनात कोण बर सोबत येणार
काट्यांनी भरलेल्या वाटेवर..कोण का बर धावणार..
एका प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता
तो वरच नवीन एक प्रश्न पडणार
मांडलेल्या या जीवनाच्या खेळाचा हा डाव कसं बर सोडवणार..
मिटलेल्या डोळ्यांना आता स्वप्न दिवसाही पडणार
जणू सुकलेल्या वेलीवर, एक कळी हळुवार उमलणार
उमलेल्या कळीला, पडलेल्या स्वप्नांना आता कोण बर थांबवणार..
कोण नसेल सोबत तर ही वाट कशी बर संपणार .

~ ओमप्रकाश पांचाळ ✓ कोन बरं थाबवनार

कोन बरं थाबवनार

7 Love

a2028c5f50c3ebc9205d71a7a2cd606d

omprakash panchal

काय होतय काय चालू आहे समजतच नाही...
आशेच्या हिंदोळ्यावर मन  घुमे वाऱ्यावरी..
अल्लड  अवखळ भिरभिरे गगणातूनी..
तरी ना मिले वाट तयाासी..
काय नवी ती रूपरेषा उमजतच नाही..
काही करावं आता अस का बर वाटतं नाही.. रुसले मन माझे की मी मीच सोडली सावली माझ्या अंतरंगाची ते कळत नाही...
काय होतय काय चालू आहे समजच नाही...


-ओमप्रकाश पांचाळ # समजतं नाही

# समजतं नाही

8 Love

a2028c5f50c3ebc9205d71a7a2cd606d

omprakash panchal

कधी कधी वाटते स्वतःवरच रागवावे.. 
तर कधी वाटते स्वतःवरच रुसावे.. 
कधी वाटते ललकारावे साऱ्या जगास .. 
तर कधी वाटते आपण हून लढावे स्व:तास..
कधी वाटते वाट पाहत राहावे ..      
      
तर कधी वाटते आता आपण हून निघावे..


- ओमप्रकाश पांचाळ #कधी वाटते

#कधी वाटते

8 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile