Nojoto: Largest Storytelling Platform

माय मराठी संत महंत ज्ञानी ज्ञानाच्या खाणी अमृततुल

माय मराठी

संत महंत ज्ञानी
ज्ञानाच्या खाणी
अमृततुल्य वाणी
सजविली मराठी!

गीता ज्ञानाचा झरा
ज्ञानेश्वरी भाषांतरा
केले बहू उपकारा
रुजविली मराठी!

झेंडे अटकेपार
तळपली तलवार
छत्रपती ते स्वार
गाजविली मराठी!

अभंग नि भारुडे
कविता वा पोवाडे
साहित्य मनघेवडे
फुलविली मराठी!

आधुनिकतेची कास
धरुनी केला विकास
जनमानसी उल्हास
खुलविली मराठी!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #Gudi_Padwa
माय मराठी

संत महंत ज्ञानी
ज्ञानाच्या खाणी
अमृततुल्य वाणी
सजविली मराठी!

गीता ज्ञानाचा झरा
ज्ञानेश्वरी भाषांतरा
केले बहू उपकारा
रुजविली मराठी!

झेंडे अटकेपार
तळपली तलवार
छत्रपती ते स्वार
गाजविली मराठी!

अभंग नि भारुडे
कविता वा पोवाडे
साहित्य मनघेवडे
फुलविली मराठी!

आधुनिकतेची कास
धरुनी केला विकास
जनमानसी उल्हास
खुलविली मराठी!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #Gudi_Padwa