प्रिय राजसां, प्रेमपत्र खरं तर जिव्हाळयाचा विषय. मनाच्या कोप-यात कायम जपला जाणारा. घरच्यांपासुन लपवला जाणारा विषय. गालातलं हसू ओठांपर्यंत येऊ नये, उरातली घालमेल नजरेत दिसू नये म्हणुन जीवाचा आटापीटा केला जाणारा विषय. आणि इतक्या सुंदर विषयाला मला हात ही घालता येऊ नये इतकी प्रेम या भावनेपासुन अलिप्त झालेली मी. विचित्र ना? हो मी आहेच जरा विचित्र. नाहीत कळत मला प्रेमाचे फंडे, प्रेमात घेतल्या जाणाऱ्या खोट्या आणा भाका, ते खोटं खोटं बोलणं, ते उगाचच रुसणं, भांड-भांडणं आणि लगेच सगळं विसरून पुन्हा पहिल्या सारखं वागणं. प्रेमात Possessive असावं माणसानं पण इतकं की समोरची व्यक्ती एक माणुस आहे आणि तिला तिची स्वतःची अशी Self Respect आहे. तिला तो Respect दयायलाच हवा हे कसं विसरतो यार आपण. मी माणुस म्हणुन माझी स्वतःची एक Space असणार, माझी Self Esteem माझ्यासाठी प्रेमापेक्षाही जास्त महत्वाची असूच शकते ना.तू ते समजू शकत नसशील तर निदान Respect तरी कर. फ़क्त तू पुरुष आहेस आणि मी स्त्री आहे म्हणुन तू माझ्या Character विषयी काही बोलणार असशील तर मी ना सीता आहे एकटीने अग्निपरीक्षा दयायला, ना द्रोपती आहे तुझ्या चूकीमुळे मी स्वतः अपमानित व्हायला. हे आणि असेच लाखो विचार मला प्रेम करण्यापासुन आणि प्रेमपत्र लिहिण्यापासुन रोखतात. हे एव्हाना तुला कळले असेल ना? पण Don't Worry मी जोवर एक छानसे प्रेमपत्र लिहित नाही तोवर मी प्रेमपत्र लिहिणे थांबवणार नाहीये. So,, वाचायला तयार रहा. असेही डाकखाने तो बंद है, Digital ख़तों से काम चलाया जाये.. अभी बातचीत बंद हैं, मोबाईल से काम चलाया जाये..😉 - तुझीच ©#Shilpa_ek_Shaayaraa आणखी एक प्रयत्न.. #प्रिय_राजसां #प्रेमपत्र #WrittingMoods #Broken_but_Beautiful #strugling_life #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358