Nojoto: Largest Storytelling Platform

White #अव्यक्त प्रेमाची भाषा.... शब्दवेडा किशोर न

White #अव्यक्त प्रेमाची भाषा....
शब्दवेडा किशोर
न बोलता तू समजून घे
माझ्या न बोललेल्या भावनांना 
शब्दांच्या भिंती पलीकडे असलेल्या
माझ्या मनीच्या गूढ कोपऱ्यांना 
डोळ्यातलं बोलणं माझ्या तू वाचशील का 
ओठांनी न व्यक्त झालेलं भावनांचं जाळं मुक्त करुनिया
हृदयीच्या तारा तू छेडशील का 
स्पर्शही न झालेलं अव्यक्त गुज तू नव्याने व्यक्त करशील का 
गर्दित असलो सदा तरी असे एकटाच मी
शोधितो नेहमी तुझ्या नजरेत माझा देहनिवारा
कधी समजशील तु माझ्या मनीचं अबोल गुज
असे अबोल गुपीतांचा हा खेळ निराळा सारा
आसवांना माझ्या शब्दांची गरज नसते
हसण्यातही सदा माझ्या वेदनांची लकेर वसते
घे आतातरी समजून माझ्या मुक्या भावना
अन् घे समजून माझ्या हृदयीची भाषा
दे आधार या मना अन् शब्द ओठातुन निघण्याआधीच
ओळख तु माझ्या अमोघ अन् अबोल अव्यक्त अशा प्रेमाची भाषा

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
White #अव्यक्त प्रेमाची भाषा....
शब्दवेडा किशोर
न बोलता तू समजून घे
माझ्या न बोललेल्या भावनांना 
शब्दांच्या भिंती पलीकडे असलेल्या
माझ्या मनीच्या गूढ कोपऱ्यांना 
डोळ्यातलं बोलणं माझ्या तू वाचशील का 
ओठांनी न व्यक्त झालेलं भावनांचं जाळं मुक्त करुनिया
हृदयीच्या तारा तू छेडशील का 
स्पर्शही न झालेलं अव्यक्त गुज तू नव्याने व्यक्त करशील का 
गर्दित असलो सदा तरी असे एकटाच मी
शोधितो नेहमी तुझ्या नजरेत माझा देहनिवारा
कधी समजशील तु माझ्या मनीचं अबोल गुज
असे अबोल गुपीतांचा हा खेळ निराळा सारा
आसवांना माझ्या शब्दांची गरज नसते
हसण्यातही सदा माझ्या वेदनांची लकेर वसते
घे आतातरी समजून माझ्या मुक्या भावना
अन् घे समजून माझ्या हृदयीची भाषा
दे आधार या मना अन् शब्द ओठातुन निघण्याआधीच
ओळख तु माझ्या अमोघ अन् अबोल अव्यक्त अशा प्रेमाची भाषा

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर