Nojoto: Largest Storytelling Platform

"शृंगार साज " नटण्याची ना हौस तुला, नाही शृंगाराच

"शृंगार साज "

नटण्याची ना हौस तुला, नाही शृंगाराची गरज ।
अशी लाखात एक देखणी तू, वेगळा तुझा साज ।।

नितळ शुभ्र कांती तुझी, किती तेजोमय दिसते ।
जणू राणी पद्मिनी माझी, मलाच तू भासते ।।

नाक जणू चाफेकळी आणि ओठ गुलाबपाकल्या ।
चिंचपेटी ती मोत्याची, उठून दिसते तुज्या गळ्या।।

नाजूक नाकी शोभे नथ, माथी कुंकू चंद्रकोर ।
हाती वसे चुडा कंकण, शालूला का कुणाची सर ।।

पायी पैंजण चांदीचे, करती तालात छमछम ।
कुडी कानात शोभती, कशी लाजती चमचम ।।

वेडे बघ ना जरा, समोर मढवलेल्या दर्पणात ।
तो ही म्हणतो कसा ? फिकी पडेल रंभा क्षणात ।।

मज करिती नयन घायाळ तुझे, होता एकमेका नजर ।
छेडून जाते हृदयाची तार, भरूनी येतो प्रणयाचा हुंकार ।।

झालो मी बावरा आता ,तुझी स्तुती करता करता ।
शब्द शब्द जोडून सारे, झालो निःशब्द मी आता ।।

...वैभव सुरेश मिरगल