Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस सोनेरी कोवळी किरणे नभातुनि अवतरली कृपावर्षेने

पाऊस
सोनेरी कोवळी किरणे नभातुनि अवतरली
कृपावर्षेने वरूणाच्या धरणी ही सुखावली

थेंब नभीचा होऊन येई मनसोक्त धारा
देण्यास नवजीवन शिरे मातीच्या उदरा
पावसाच्या सरी भुईवर येती झरझरा
स्वागतास वाहे सोसाट्याचा वारा

पिकांशी खेळी पावसाच्या धारा
फुलवून पिसारा मोर ही झाला बावरा
खेळतो लपंडाव विजेसंग नभीचा वारा
धाकाने विजेच्या गुरे शोधती निवारा

थरथरे धरणी झोंबती देहास वारे
रक्षणास पिल्ल्यांच्या शिरती घरट्यांत पाखरे
मदमस्त पाऊस वाऱ्यास बिलगून भुईवरी सळसळे
खळखळ नादात वाहती पाण्याचे झरे 

सोनेरी कोवळी किरणे भूमीवरी नभातुनि अवतरली
कृपावर्षेने वरूणाच्या धरणी ही सुखावली
          धरणी ही सुखावली
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले पाऊस
पाऊस
सोनेरी कोवळी किरणे नभातुनि अवतरली
कृपावर्षेने वरूणाच्या धरणी ही सुखावली

थेंब नभीचा होऊन येई मनसोक्त धारा
देण्यास नवजीवन शिरे मातीच्या उदरा
पावसाच्या सरी भुईवर येती झरझरा
स्वागतास वाहे सोसाट्याचा वारा

पिकांशी खेळी पावसाच्या धारा
फुलवून पिसारा मोर ही झाला बावरा
खेळतो लपंडाव विजेसंग नभीचा वारा
धाकाने विजेच्या गुरे शोधती निवारा

थरथरे धरणी झोंबती देहास वारे
रक्षणास पिल्ल्यांच्या शिरती घरट्यांत पाखरे
मदमस्त पाऊस वाऱ्यास बिलगून भुईवरी सळसळे
खळखळ नादात वाहती पाण्याचे झरे 

सोनेरी कोवळी किरणे भूमीवरी नभातुनि अवतरली
कृपावर्षेने वरूणाच्या धरणी ही सुखावली
          धरणी ही सुखावली
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले पाऊस