Nojoto: Largest Storytelling Platform

White #प्रेमवेडा मी जणू शापित शब्दवेडा किशोर काळ

White #प्रेमवेडा मी जणू शापित 
शब्दवेडा किशोर 
काळोखाची ती शाल पांघरून
ही रात्र सर्वदूर पसरलेली
हिवाळ्याच्या या थंडीमध्ये
ती हुडहुडतच गोठलेली
आसमंतही रात्रीच्‍या कुशीत
थकून डोळे मिटून निजला आहे 
अन् चांदण्‍याही त्या ढगाआड
मंद होऊ लागल्‍या आहे 
अशा शांत-एकांत क्षणी
मी मात्र तुलाच शोधतोय
या गर्द काळोखात
तू नाहीस माहित असतानाही
मी उगाच आस लावतोय
हा वेडेपणा असला तरी
मला मात्र फार आवडतो
तुला शोधण्‍याचा हा खेळ
जो मी आजही अगदी
मनापासून खेळतो

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून
White #प्रेमवेडा मी जणू शापित 
शब्दवेडा किशोर 
काळोखाची ती शाल पांघरून
ही रात्र सर्वदूर पसरलेली
हिवाळ्याच्या या थंडीमध्ये
ती हुडहुडतच गोठलेली
आसमंतही रात्रीच्‍या कुशीत
थकून डोळे मिटून निजला आहे 
अन् चांदण्‍याही त्या ढगाआड
मंद होऊ लागल्‍या आहे 
अशा शांत-एकांत क्षणी
मी मात्र तुलाच शोधतोय
या गर्द काळोखात
तू नाहीस माहित असतानाही
मी उगाच आस लावतोय
हा वेडेपणा असला तरी
मला मात्र फार आवडतो
तुला शोधण्‍याचा हा खेळ
जो मी आजही अगदी
मनापासून खेळतो

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून