Nojoto: Largest Storytelling Platform

एक दिवस सुंदर अशी पहाट उगवली भल्या पहाटेच शिवनेरी

एक दिवस सुंदर अशी पहाट उगवली 
भल्या पहाटेच शिवनेरी ची तोफ गरजली
वाऱ्याची झुळूक ही सह्याद्रिच्या कुशीत डोलावली
गुलामीत स्वातंत्र्याची चाहूल पहाट घेऊन आली
जिजाऊ पोटी शिवा जन्मला सांगत मुके पाखरेही किलबलली

राजमाता जिजाऊ चा इवलासा अंश होता तो सिंहाचा छावा
ज्यांनी शिकवले मावळ्यांना गनिमी कावा
पुरून उरले मर्द मराठे असंख्य मुघलांना 
जेव्हा उफाळला मावळ्यांच्या रक्तातील लाव्हा

मस्तकी जिरेटोप न हाती भवानी तलवार
फडकविला भगवा झेंडा छातीवर शोषुन वार
जिकून घेतले असाध्य असे दुर्ग 
अफाट सागरालाही केले बंदिस्त राजेंनी बांधून किल्ले सिंधुदुर्ग

परस्त्री असते माते समान या विचाराने
शत्रूराज्यांच्या स्त्रियांसही दर्जा स्वतःच्या आई-बहिणींचा देई
जगातील एकमेव माझे राजे असे ज्यांच्या दरबारात 
नाचली नाही कधीच नर्तकी बाई

पराक्रमी शिवाजी महाराष्ट्री अवतरला
मूठभर मावळे घेऊन शत्रूंच्या तोफांसमोर तलवार घेऊनि एकटाच उभा ठाकला
ना भूतो ना भविष्य एक राजा साऱ्या जगाचा छत्रपती शिवाजी महाराज जाहला

ज्याला माज होता दिल्लीच्या तख्ताचा 
तोच  पळाला जिवाच्या आकांताने  पाहून  वाघ भगव्या रक्ताचा
अभिमान आम्हांस आमच्या राजेंचा
रक्षणास ठायी राही सदा रयतेच्या
रक्षणास ठायी राही सदा रयतेच्या

लेखन:- आशिष गंगाधरजी चोले. राजे