*झाकोळले नभ* *पिसाटला वारा* *आसावली धरा* *मीलना अधीरा...* *अवेळी धिंगाणा* *अल्लड सरींचा* *भिजल्या पंखांना* *ध्यास घरट्याचा...* *गंधाळली माती* *कस्तुरी सुवास* *भेगाळल्या मनां* *अंकुरली आस...* *कुंभातून आल्या* *झरझर सरी* *शिंपले अमृत* *माळरानावरी...* *ओघळ पाण्याचे* *खळखळ भारी* *नाद उन्मेषाचा* *चेतवला उरी...* *प्रसवली भूमी* *तरारले बीजं* *जपलं उदरीं* *स्वप्नं तुझं माझं...* ©Shankar kamble #पाऊस #पाऊसधारा #पाऊसाततुझीआठवण #नभ #पाऊसाचा #पाऊसाला #पाऊसावर