नियतीने नाव लिहिले नाही तुझे माझ्या जीवनाच्या पुस्तकात . . तु निर्णय घेतलास तो मान्य आहे तिळमात्र ही तिरस्कार नाही माझ्या मनात . . निरपेक्ष जीव लावणं , जीवापाड काळजी घेणं सांग ना , कोण करतं इतकं या कल युगात . . ओढ असते तुला नेहमी आतुर असतेस आज सांगशील का नेमकं काय आहे माझ्यात. . नात्याला काय नाव देऊ या , तूच सांग ना की वाहत जायचे आहे , या निर्मळ प्रवाहात . . दोघांची दिशा देखील विरुद्ध दिशेला असली तरीही तुला दिसतो प्रेमभाव माझ्यात . . जीव किती लावला असता एकमेकांना जर कुंकू भरता आले असते तुझ्या भांगात . . प्रत्येक क्षण तुझ्यावर कुर्बान केला असता आपल्या प्रेमाचे गोडवे गायले असते चार चौघात . . ©Mohit Jain #crushedpaper