Nojoto: Largest Storytelling Platform

नियतीने नाव लिहिले नाही तुझे माझ्या जीवनाच्या पुस्

नियतीने नाव लिहिले नाही तुझे
माझ्या जीवनाच्या पुस्तकात . .
तु निर्णय घेतलास तो मान्य आहे 
तिळमात्र ही तिरस्कार नाही माझ्या मनात . .

निरपेक्ष जीव लावणं , जीवापाड काळजी घेणं
सांग ना , कोण करतं इतकं या कल युगात . .
ओढ असते तुला नेहमी आतुर असतेस 
आज सांगशील का नेमकं काय आहे माझ्यात. .

नात्याला काय नाव देऊ या , तूच सांग ना 
की वाहत जायचे आहे , या निर्मळ प्रवाहात . .
दोघांची दिशा देखील विरुद्ध दिशेला असली 
तरीही तुला दिसतो प्रेमभाव माझ्यात . .

जीव किती लावला असता एकमेकांना 
जर कुंकू भरता आले असते तुझ्या भांगात . .
प्रत्येक क्षण तुझ्यावर कुर्बान केला असता 
आपल्या प्रेमाचे गोडवे गायले असते चार चौघात . .

©Mohit Jain #crushedpaper