रात्र मुक्त चांदण्याची ओढ उरी मिलनाची काहूर दाटे पुसल्या मनी आस स्पर्श वेढण्याची ज्योत मालवूनी चांदव्याची आता भुलावणी समीराची तनु वेल केविलवाणी ती शोधीत आधार देहतरुची रानी माळ त्या काजव्यांची स्पर्श करता ,आस रिक्तस्मानाची आता नको दुरावे ,नको पुरावे आर्जव आता तव बाहू पाकळीत मिटण्याची ##मनस्वी स्पंदने (पल्लवी) फडणीस,भोर✍🏻 शब्दार्थ पुसल्या - हरवलेल्या ©Pallavi Phadnis