मी ना धड शहाणी ना वेडी म्हणूनच टिकली लावू की नेसू साडी ,हातात बांगडी की घेऊ तोंडात पेटती विडी मी तर बाई आधुनिक नारी जगाच्या बेगडी बंधनात प्रियकराची शोना तर पप्पाची लाडाची बिनपराची परी मला बाई आवडतात कपडे तोकडे ,ज्यांना मी आवडते ती तर धर्मांध प्रेमळ बोकडे बाकी तसे ही पूर्वज होतीच माकडे मी मुक्त ,स्वैर कधी अबला लाचार म्हणून होतात म्हणे एकटे कधी समूहाने ,सामाजिक अत्याचार कधी विनयभंग कधी पाशवी बलात्कार माझे काही ही होवू दे तुमची भाजतीय ना पोळी राजकारणात सगळे राखून कधी पोळी तर कधी खायची नळी मलाच कळेना संस्कार काय असतात , पण ते प्रतिष्ठित नेते मात्र शब्दासंस्कार करून कधी हातात हातकधी मिठीत , कधी नजरेने अत्याचार करतात आता मुलगी असो की महिला ती आहे अबला ,म्हणून जो तो परिणामांचे भाकीत ,स्त्री पुरुष गणित संरक्षणाचे कोलीत घेऊन येतो नाचायला एवढी होवून ही ती तुकड्यातच मरते कधी मानसिक कधी शारीरिक कधी मोर्चे ,कधी मौन ,कधी गौण एकटी नी एकटी मातीतच विरते ##मनस्वी स्पंदने पल्लवी फडणीस,भोर✍🏻 ©Pallavi Phadnis #feelings