Nojoto: Largest Storytelling Platform

रंग.... रंगांची मज्जाच काही वेगळी, या अनोळख्या दुन

रंग....
रंगांची मज्जाच काही वेगळी,
या अनोळख्या दुनियेत सहभागी होती सगळी.
नाही म्हणले तरी कुणी, 
सामावून घेतो सर्वांनाच मनी. 
लाल रंगाची चढली लाली प्रेमाला, 
गुलाबी रंग विश्वास जणू त्यातला. 
हिरवा रंग बहरतो श्रावणात, 
निळा रंग पसरे साऱ्या अवकाशात. 
पांढरा  रंग तर आहे शांत जणू काहीसा,
पिवळा रंग येऊनी जवळ करतो मग हवाहवासा. 
रंगा शिवाय अर्थ  नसे या जीवनाला, 
बरेचसे चांगल्या वाईट छटा उमटती या मनाला.

©Mayuri Bhosale रंग
रंग....
रंगांची मज्जाच काही वेगळी,
या अनोळख्या दुनियेत सहभागी होती सगळी.
नाही म्हणले तरी कुणी, 
सामावून घेतो सर्वांनाच मनी. 
लाल रंगाची चढली लाली प्रेमाला, 
गुलाबी रंग विश्वास जणू त्यातला. 
हिरवा रंग बहरतो श्रावणात, 
निळा रंग पसरे साऱ्या अवकाशात. 
पांढरा  रंग तर आहे शांत जणू काहीसा,
पिवळा रंग येऊनी जवळ करतो मग हवाहवासा. 
रंगा शिवाय अर्थ  नसे या जीवनाला, 
बरेचसे चांगल्या वाईट छटा उमटती या मनाला.

©Mayuri Bhosale रंग