White #हे गणराया..पत्रास कारण की.... शब्दवेडा किशोर ( चाल :- लालबाग परळ या सिनेमा मधील पत्रास कारण की या गीतावर आधारित माझा हा पाहिला गितलेखणाचा प्रयत्न ) हे गणराया..पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही तुझ्या चरणाशी सुद्धा आता येण्याइतकी आमची लायकी नाही.... कलीच्या नजरेखाली आम्ही वाढतो आहे रोज इथं तुझे संस्कार आम्ही सदा जाळतो आहे व्यसनाच्या आहारी जाऊन घरं उध्वस्त करतो आहे आमच्या आया बहिणींची आब्रू रोजच आम्ही लुटतो आहे म्हणून तुझ्या सावलीत आमची अस्तित्व माया उभारायची आमची आता लायकी नाही पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही.... कर काही चमत्कार अन् मरू दे आमच्यातला हा दानवी भार जाळूनिया घे मायेने लेकरांना छातीशी तु धर स्वतःची पुन्हा छाया आमच्या डोईवर तु वचन देतो विघ्नहर्त्या आम्ही तुझ्या संस्काराची फुलं ओंजळीत ठेऊ आया बहिणींना पुन्हा नवा सुरक्षित जन्म देऊ देवा तुझी शिकवणीला आता आम्ही राखेत सडू देणार नाही तुझीया चरणाच्या धुळीचं सत्व कडू होऊ देणार नाही माफ करुनीया आम्हा चरणाशी घे रे तुझी कृपादृष्टी अशीच कायम आमच्यावरी ठेव रे आता तुझ्या अस्तित्वाला आम्ही तडा जाऊ देणार नाही तुझ्या रूपापासून स्वतःला तुटू देणार नाही हेच माघणं देवा तुझ्या समोर देवा मांडू शकत नाही म्हणून सांगतो की हे देवा श्री गणराया..पत्रास कारण की..बोलायची हिम्मत नाही.. तुझ्या चरणाशी सुद्धा आता येण्या इतकी आमची लायकी नाही.. ©शब्दवेडा किशोर #गणराया