Nojoto: Largest Storytelling Platform

वाटू लागे आम्हा जेव्हा रोगाचा त्रास येते आठवण फक्त

वाटू लागे आम्हा जेव्हा रोगाचा त्रास
येते आठवण फक्त तेव्हाच डॉक्टरांची हमखास
लावतो अचूक अंदाज बघुनी रोग्याची लक्षणे
रक्तसंबंध नसतांनाही सर्वांची घेतो काळजी कटाक्षाने

डॉक्टर म्हणून जगतांना  पहाटेचे सूर्यनमस्कार न संध्याकाळच्या सूर्यास्ताचे नाव ओठी
माय बाप अन लेकरंही आतुर यांच्या भेटीसाठी

मरू लागले लोकं जेव्हा उपचार नसलेल्या रोगाने
तेव्हा बरे केले डाक्टरांनीच स्वतःच्या अथक परिश्रमाने
भीती असते डॉक्टरांनाही होईल लागण विषाणूची रोग्यांपासून
पर्वा न करता जीवाची आणतात रोग्यांना परत मृत्यूच्या दारातून

कोरोनाच्या या वापरलेल्या किटमध्ये डॉक्टर घामाने ओथंबुन निघतात
देवाची होणारी कमतरता डॉक्टरच पूर्ण करतात
लेखन:-आशिष गंगाधरजी चोले. डॉक्टर