Nojoto: Largest Storytelling Platform

उधाण आलेले वादळ वाऱ्याला पावसाच्या सरी ओघळू लागल्

उधाण आलेले 
वादळ वाऱ्याला
पावसाच्या सरी
ओघळू लागल्या

पाखरांचे थवे
निवारा शोधती
पाण्याने भरली 
धरतीची ओटी

ओघळल्या सरी
मातीत खेळती
सुखाचे धुमारे
भुईला फुटती

अंगणी घुमतो
आनंद पारवा
नभाला सांगतो
मनाचा गारवा

©Archana Pol गारवा
उधाण आलेले 
वादळ वाऱ्याला
पावसाच्या सरी
ओघळू लागल्या

पाखरांचे थवे
निवारा शोधती
पाण्याने भरली 
धरतीची ओटी

ओघळल्या सरी
मातीत खेळती
सुखाचे धुमारे
भुईला फुटती

अंगणी घुमतो
आनंद पारवा
नभाला सांगतो
मनाचा गारवा

©Archana Pol गारवा
archanapol5687

Archana Pol

New Creator