Nojoto: Largest Storytelling Platform

White *एक आठवण...* शब्दांचा साठा जरा कमीच आहे माझ

White *एक आठवण...*

शब्दांचा साठा जरा कमीच आहे माझ्याकडे,
तरीही जे काही सुचेल ते लिहितो मी,
तुला कळो या ना कळो,
पण भावना व्यक्त मात्र करतो मी...

मला कुठे कळते तुझी इंग्रजी,
मी तर माय मराठीचं लेकरू,
भाषा जरी वेगळी आपली,
तरी भाव मात्र share करू.

तुझ्या बोलण्यातला गोडवा,
आणि माझ्या शब्दांतील ओलावा,
दोन जगांची दोन मनं,
तरीही जुळला प्रेमाचा धागा नवा...

तू बोलतेस प्रेम love म्हणून,
मी म्हणतो त्याला फक्त प्रेम,
तू म्हणतेस miss you हळूच,
मी पुटपुटतो, "खरंच गं, तु खुप आठवते !"

तुझ्या हसण्यातलं सौंदर्य,
आणि माझ्या कवितेतला भाव,
एकत्र आल्यावरच समजेल,
की प्रेमाला भाषा नसते, ना वेगळे नाव!

म्हणून शब्द कमी असले तरी,
भावना मात्र तुझ्यासाठी या खास,
भाषा जरी समजली नाहीतुझी,
तरी प्रेम मात्र तुला कळेल नक्की एकदाच!!!

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #love_shayari  love poetry for her poetry on love sad poetry #Love #Poetry #Life
White *एक आठवण...*

शब्दांचा साठा जरा कमीच आहे माझ्याकडे,
तरीही जे काही सुचेल ते लिहितो मी,
तुला कळो या ना कळो,
पण भावना व्यक्त मात्र करतो मी...

मला कुठे कळते तुझी इंग्रजी,
मी तर माय मराठीचं लेकरू,
भाषा जरी वेगळी आपली,
तरी भाव मात्र share करू.

तुझ्या बोलण्यातला गोडवा,
आणि माझ्या शब्दांतील ओलावा,
दोन जगांची दोन मनं,
तरीही जुळला प्रेमाचा धागा नवा...

तू बोलतेस प्रेम love म्हणून,
मी म्हणतो त्याला फक्त प्रेम,
तू म्हणतेस miss you हळूच,
मी पुटपुटतो, "खरंच गं, तु खुप आठवते !"

तुझ्या हसण्यातलं सौंदर्य,
आणि माझ्या कवितेतला भाव,
एकत्र आल्यावरच समजेल,
की प्रेमाला भाषा नसते, ना वेगळे नाव!

म्हणून शब्द कमी असले तरी,
भावना मात्र तुझ्यासाठी या खास,
भाषा जरी समजली नाहीतुझी,
तरी प्रेम मात्र तुला कळेल नक्की एकदाच!!!

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #love_shayari  love poetry for her poetry on love sad poetry #Love #Poetry #Life