Nojoto: Largest Storytelling Platform

उपकार तुमचे इतके आमच्यावर की कधी विसरू शकणार नाही,

तुम्ही झालात बाबा दीलितांचे, आणि रमाई झाली आई.

शतकांपासून होतो चिखलात, तुम्ही आणल आम्हाला वरी,
सगळ्यांनी तर दिशाभूल केलती, बस तुम्हीच दाखवली दिशा खरी.

वर्गाबाहेर बसून घेतल शिक्षण आणि मिळवली डिग्री,
जगात बघा आज तुमच्या नावाची चर्चा आहे सगळी.

ज्या लोकांनी तिरस्कार केलता, आज त्यांची पोरं घालतात तुमच्या फोटोला हार,
सामान्यांपासून - मत्र्यांपर्यंत सर्वांची झुकते तुमच्यासमोर आदराने मान.

त्यांच्या प्रतिमेचा तर झालाच पाहिजे सन्मान, ज्यांनी साकारली सुंदर प्रतिमा भारताची,
त्या व्यक्तीचा तर व्हायलाच हवा जयजयकार ज्यांनी चढली ही भलीमोठी पायरी संविधानाची.

तरी काहींच्या मनात हा प्रश्न की काय केलं बाबासाहेबांनी आमच्यासाठी?
तर सविधान वाच इतिहास वाच मग कळेल तुला किती हक्क दिले बाबासाहेबांनी जगण्यासाठी.

रात्र रात्र जागीले जेणेकरून तुला मिळावी सुखाची झोप,
एकदम साधी जीवनशैली जगले कधीच नाही ठेवला कशाचा शोक.

विश्वरत्न कायदेतज्ञ महामानव भारतातील सर्वोच्च नागरी भारतरत्न हा मिळाला त्यांना पुरस्कार,
ज्या समाजाला अस्पृश्य मानत होते त्या समाजाला मिळवून दिला यांनी सन्मानाने जगण्याचा अधिकार.

अभिवादन करितो, नमन करितो, करितो कोटी कोटी प्रणाम,
प्रत्येकाच्या मुखावर आज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हेच नाम.

             - साहिल तायडे

©sahil tayde Dr Babasaheb Ambedkar

#Ambedkar_Jayanti