Nojoto: Largest Storytelling Platform

डोक्यावर पदर म्हणजे बाई राखते सन्मान पडलाच चुकून ख

डोक्यावर पदर म्हणजे बाई राखते सन्मान
पडलाच चुकून खाली की झालाच अवमान

डोक्यावर पदर म्हणजे ती शालीन
नाहीच घेतला तर ती झालीच असंस्कारी

डोक्यावर पदर म्हणजे जपली संस्कृती
नाहीतर खाल्लीच तिने माती

डोक्यावर पदर,खाली मान शोभली पाहिजे ती संस्कारी बाहुली
फुटलाच कंठ तिला की झाली संस्कारांची पायमल्ली

सारला पदर बाजूला, पाऊल टाकले उंबराठ्याबाहेर
की मिळालीच धुळीला इज्जत

डोक्यावरचा पदर सावरून सावरते संसार ती
विचारा तिलाही कधीतरी काय हवंय तुला बाई 

मोकळ्या आभाळाशिवाय काही मागायची नाही ती
मिळुद्या पदरावीण मुक्ती तिलाही

जखडून ठेवलेल्या रुढीत जखडत तिच अस्तित्व
घेउद्या जरा मोकळा श्वास तिला

जगुद्या तिचा तिला स्वाभिमान
झुकवणार नाही ती तुमची मान. #स्त्री #स्वातंत्र्य #मराठीकविता
डोक्यावर पदर म्हणजे बाई राखते सन्मान
पडलाच चुकून खाली की झालाच अवमान

डोक्यावर पदर म्हणजे ती शालीन
नाहीच घेतला तर ती झालीच असंस्कारी

डोक्यावर पदर म्हणजे जपली संस्कृती
नाहीतर खाल्लीच तिने माती

डोक्यावर पदर,खाली मान शोभली पाहिजे ती संस्कारी बाहुली
फुटलाच कंठ तिला की झाली संस्कारांची पायमल्ली

सारला पदर बाजूला, पाऊल टाकले उंबराठ्याबाहेर
की मिळालीच धुळीला इज्जत

डोक्यावरचा पदर सावरून सावरते संसार ती
विचारा तिलाही कधीतरी काय हवंय तुला बाई 

मोकळ्या आभाळाशिवाय काही मागायची नाही ती
मिळुद्या पदरावीण मुक्ती तिलाही

जखडून ठेवलेल्या रुढीत जखडत तिच अस्तित्व
घेउद्या जरा मोकळा श्वास तिला

जगुद्या तिचा तिला स्वाभिमान
झुकवणार नाही ती तुमची मान. #स्त्री #स्वातंत्र्य #मराठीकविता