Nojoto: Largest Storytelling Platform

मागमूस.. जाऊ दे...विचार नाही करायचा एक आगळा श्वास

मागमूस..

जाऊ दे...विचार नाही करायचा
एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा
इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा
नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा
हो हे असेच चालायचे निरंतर इथे
माणसांचे नावापुरतेच गराडे जिथे
साथ द्यायची येताच वेळ धूम ठोकतात
नको ,नको तिथे अगदी गरळ ओकतात
खरे काय नि खोटे काय सगळांच प्रश्न
वाचेत असला तरी असत नाही कृतीत कृष्ण 
सावरावं स्वतःला अन् आवरावं भावनांना
का उगाचं पुन्हा पुन्हा कुरवाळावं घावांना
संपणार ना छळ अन् छळणारा माणूस
माणसंच सगळी माणुसकीचा ना मागमूस.....

मी माझी.....
15/05/2023

©Sangeeta Kalbhor
  #boat मागमूस..

जाऊ दे...विचार नाही करायचा
एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा
इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा
नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा
हो हे असेच चालायचे निरंतर इथे
माणसांचे नावापुरतेच गराडे जिथे

#boat मागमूस.. जाऊ दे...विचार नाही करायचा एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा हो हे असेच चालायचे निरंतर इथे माणसांचे नावापुरतेच गराडे जिथे #शायरी

269 Views