Nojoto: Largest Storytelling Platform

पहिला पाऊस.. पहिल्या पावसाची ती गोष्टच न्यारी.. त

पहिला पाऊस..

पहिल्या पावसाची ती गोष्टच न्यारी..
तो आला की येते आपोआपच मनाला उभारी..

धरती मायेची तहान भागवणारी पावसाची पहिली सर..
तीच तर घेऊन येते आपल्यासाठी आनंद अन् उत्साहाची लहर..

झाडे, वेली, फुले सगळेच टवटवीत करून टाकते..
अख्ख्या निसर्गालाच जणू काही साजरं बनवून जाते, ती पावसाची सरच असते.. 

हाच पाऊस विचारांमध्ये मग्न असलेल्या आपल्याला आनंदाची चादर पांघरून भिजायला तर लावतोच..
.."मिळालेला आनंद हा उपभोगण्यासाठी असतो!"..ही शिकवण देण्याचं काम मात्र तो नेहमी करतोच..

खरं तर, पहिल्या पावसाचा तो आनंद विचारायला हवा त्या शेतकऱ्याला..
जो वर्षभर पिकांसाठी आतुरतेने वाट बघत असतो त्या पावसाच्या थेंबांची, अशा त्या शेतकरी राजाला..

प्रत्येकासाठी हा आनंद वेगळा असतो..
कोणासाठी मनाचा आनंद देणारा ठरतो..
तर कोणासाठी वर्षभर वाट पाहिल्यानंतर आनंदाचं फळ देणारा एक असतो..

पहिला‌ पाऊस..ज्याची खरी मज्जा ही तो अनुभवण्यातच असते🌧️
    
                                                                                                     -हर्षदा भंगाळे. #bachpan #rain❤ #firstRain