Nojoto: Largest Storytelling Platform

मुके जाहले‌ शब्द मुके जाहले शब्द वेदनेतून उमललेल

मुके  जाहले‌ शब्द

मुके जाहले शब्द
वेदनेतून उमललेले
गवसले नाही काहीही
तरीही शिंपीत सडा गेले

मौनाची ती पंक्ती
दुसरा गुंता भावनेचा
शल्य गवसले त्रीपंक्तीत
चौथीत काहूर मनाचा

अबोला हा कल्पनेचा
की दडलेला समझोता
शपथबद्ध भासले जणू
दाटला गूढ अर्थ होता

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde
  मुके जाहले शब्द

मुके जाहले शब्द #मराठीकविता

167 Views