Nojoto: Largest Storytelling Platform

तिचा आलेला राग तिच्यावर कधी काढलाच नाही तिच्यासाठी

तिचा आलेला राग तिच्यावर कधी काढलाच नाही
तिच्यासाठी झुरणारं मन तिला कधीच कळलं नाही

बोलत होती,भांडत होती तस नातं आमचं जवळचंच
सारं काही कळायचं तिला,तिला फक्त मीच कळलो नाही.

नेहमी म्हणायची सांग तुझ्या मनात कोण आहे
ही आवडते,का ती आवडते तुझं प्रेम कोण आहे

मी सांगत नाही म्हणुन ती रुसायची माझ्यावर
आता कस सांगू तिला माझं तिच्यावरच प्रेम आहे.

आयुष्यात ती माझ्या खरचं वेगळी होती
प्रेमाचं जाऊद्या,तिची सोबती छान होती

एक मैत्रीण म्हणुन ती जपायची नात्याला
तिच्या मनातले सारे काही मला सांगत होती.

तिच्यावर असणार प्रेम तिला दाखवताचं आलं नाही
त्या वेडीवर मला साधं रुसताही आलं नाही

आली एक वेळ अशी आम्ही सारेच दुरावलो
आठवण येईल तुझी मला,तिला हेही म्हणलोच नाही.

                                                    दिपक कोळसकर

©Dipak kolaskar #आठवणीच्यापुस्तकातून