Nojoto: Largest Storytelling Platform

शेवटचं पत्र आई ऐकतेच का ग, केविलवाणी हाक माझी,

शेवटचं पत्र 

आई ऐकतेच का ग, 
केविलवाणी हाक माझी, 
भर चौकातील मसनात, 
जळतीय लेक तुझी... 

बघणाऱ्या भावांना, 
दया माझी आली नाही, 
किंचाळत होते तरी मी, 
मदत कोणी केलं नाही..... 

आई तुझी लेक इकडे, 
तडफडत जळत होती, 
जशी भाकर तुझी ग, 
चुलीवर करपत होती.... 

तुला काय सांगू आई, 
जळताना काय त्रास झाला, 
वाचवा-वाचवा म्हणताच, 
पाहणारा समाज मागे झाला... 

झुंज दिली मृत्यूला पण, 
प्रयत्न माझा वाया गेला, 
तुझा चेहरा निहाळतच, 
प्राण माझा निघून गेला..... 

नितिन मा. पवार नागुरकर 
मो. 9921429995 शेवटचं पत्र
शेवटचं पत्र 

आई ऐकतेच का ग, 
केविलवाणी हाक माझी, 
भर चौकातील मसनात, 
जळतीय लेक तुझी... 

बघणाऱ्या भावांना, 
दया माझी आली नाही, 
किंचाळत होते तरी मी, 
मदत कोणी केलं नाही..... 

आई तुझी लेक इकडे, 
तडफडत जळत होती, 
जशी भाकर तुझी ग, 
चुलीवर करपत होती.... 

तुला काय सांगू आई, 
जळताना काय त्रास झाला, 
वाचवा-वाचवा म्हणताच, 
पाहणारा समाज मागे झाला... 

झुंज दिली मृत्यूला पण, 
प्रयत्न माझा वाया गेला, 
तुझा चेहरा निहाळतच, 
प्राण माझा निघून गेला..... 

नितिन मा. पवार नागुरकर 
मो. 9921429995 शेवटचं पत्र
nitinpawar8667

nitin pawar

New Creator