Nojoto: Largest Storytelling Platform

आई खूप घाई केलीस गं निघाया. हवी होतीस अजून काही वर

आई खूप घाई केलीस गं निघाया.
हवी होतीस अजून काही वर्षे फक्त सुख भोगाया...
दिलेले शब्द तुझे मला माझे तुला पाळण्यास;
निदान आखलेली स्वप्ने आकारी बघाया...
आई खूप घाई केलीस गं निघाया.

आठवणीतली तू मी स्मरणी तुझ्या;
गट्टी जरी नव्हती अपुली गाठी नक्कीच बांधल्या आहेत तुझ्या-माझ्या...
मी सर्वस्व होतो तुझा एकेकाळी बदललं काळांतराने खंत नाही;
दुःख एवढचं की तुला अपेक्षित सारं मला वेळेत देता आलं नाही.
मुलगा... भाऊ... नवरा मी जसा ही असेन
आशिर्वाद दे मज चांगला बाप व्हाया...
आई खुपच घाई केलीस गं निघाया.
.
.
.

©Mukul Mukund Khodey Missing You To The Core #माँ..💔
Birthday Wishes..🌹🙏🏼🌠

Missing You To The Core #माँ..💔 Birthday Wishes..🌹🙏🏼🌠 #poem