Nojoto: Largest Storytelling Platform

सरणावर जळताना सरणावर जळणार्या एका लाशेला म्हंटलं

सरणावर जळताना

सरणावर जळणार्या एका लाशेला म्हंटलं
सांगा ना शेवटीतरी आयुष्य कस वाटलं ?

सुटलाय ना एकदाचं कि अजून काही राहीलं?
सगळच मिळत नसतं अहो तरीही जगावं लागलं

आयुष्यात खरंच का खूप तरसावं लागलं?
पुस्तकाच्या प्रत्येक पानावर दुःख मांडावं लागलं

संसाराच्या ओझ्याखाली का खोटं हसावं लागलं?
समजवून घेत प्रत्येकाला अहो भावनांना मारावं लागलं

आयुष्याच्या पुस्तकातील ते कोणतं पान सुखानं भरलं
स्वप्नातील सुखं ‌पुस्तक अहो स्वप्नातच अर्ध राहिलं

सरणावर जळणार्या लाशेला तरीही का हसावं लागलं
अजून हृदय जळलं नव्हतं समाधान दाखवावं लागलं

✍️ निशा खरात/ शिंदे (काव्यनिश)

©nisha Kharatshinde #DiyaSalaai ...सरणावर जळताना..

#DiyaSalaai ...सरणावर जळताना.. #मराठीकविता