Nojoto: Largest Storytelling Platform

आभाळ.. हवं असतं प्रत्येकाला स्वतःच स्वतःपुरत आभाळ

आभाळ..

हवं असतं प्रत्येकाला
स्वतःच स्वतःपुरत आभाळ
कुठे ना कुठे कोणी ना कोणी
झालेलाच असतो घायाळ
मखमली नसला साज तरी
असावा वाटतो सुवास रातराणीचा
लपलेला असतो दरवळ
प्रत्येकाच्या आत आर्त कहाणीचा
नाही सांगता येत उघड जेव्हा काही
नजरेचा घ्यावा वाटतो आधार
स्पर्श असतो बोलका
नसतो त्यात इतकुसाही व्यभिचार
बळ मिळते जगण्याला
जगणे मंगल मंगल होते
प्रत्येकाचे आपापले आभाळ
आपल्यापुरते सरसावून येते.....

मी माझी.....
14/05/2023

©Sangeeta Kalbhor
  #RanbirAlia आभाळ..

हवं असतं प्रत्येकाला
स्वतःच स्वतःपुरत आभाळ
कुठे ना कुठे कोणी ना कोणी
झालेलाच असतो घायाळ
मखमली नसला साज तरी
असावा वाटतो सुवास रातराणीचा

#RanbirAlia आभाळ.. हवं असतं प्रत्येकाला स्वतःच स्वतःपुरत आभाळ कुठे ना कुठे कोणी ना कोणी झालेलाच असतो घायाळ मखमली नसला साज तरी असावा वाटतो सुवास रातराणीचा #शायरी

210 Views