White #भावनांचे ओझे.... शब्दवेडा किशोर मी किती वाहायचे सांग एकट्यानेच सदा तुझ्यासाठी मी किती झुरायचे तुजला मोल नव्हते अन् नाही काहीच माझ्या या तुजवरच्या खुळ्या प्रितीचे आर्जवे करून सतत मीच तुला सांग ना कितीदा गं विचारायचे तू तेव्हा जशी होतीस अन् आजही तशीच आहे उमजेल का गं मन माझं या आयुष्यात तुजला की पुढच्या जन्मी पुन्हा नव्याने आपण भेटायचे ? ऋणानुबंधनाच्या अनोख्या गाठींना त्या सांग मज तुच आता किती काळ मी एकट्यानेच सदा सर्वकाळ जपायचे कधी वाटतं मज की सोडून द्यावे थोडंफार हे भावनांचे ओझे मीच एकट्याने किती वाहायचे की मागचे झाले गेले का विसरून जायचे मन माझं नित्यनियमे एकट्यात सदा खुप रडतंय सांग ना कधी तुजला ते कळायचे सांग ना मज एकदा की हे भावनांचे ओझे संगतीस घेऊन मीच एकट्याने अजून त्यासोबत वाहून येणाऱ्या आसवांसोबत असे किती जीवन कंठायचे वाटे कुठेतरी मिळावा किनारा माझ्या या जीवनरूपी नौकेला तेव्हा मिळालेले शाप आहे मज तोडायचे की असंच मी एकट्याने एकट्यासाठी एकटं जगून एकटेपणाच्या या शापातंच आहे का मरायचे ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर