Nojoto: Largest Storytelling Platform

*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।* *आले वारकरी । दर्श

*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

*टाळ घेता हाती। सुटली आसक्ती।*
*जडली विरक्ती। योग्य मार्गी ।।* ३

*झंकारूनी वीणा । छेडती कर्माला।* 
*पुसती जीवाला। पापपुण्य।।४*

*माथ्यावर माझ्या। तुळस माऊली ।*
*तुझीच साऊली । घरीदारी।। ५*

*अहंभाव गळे। रिंगण करता।*
*फुगडी धरता। जाती भेद।। ६*

*स्मिता म्हणे आता । व्हावी गळाभेट ।*
*अंतरास थेट। पांडूरंगा ।।  ७*

©Smita Raju Dhonsale 🚩 *पंढरीची वारी*🚩 

*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*
*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

*टाळ घेता हाती। सुटली आसक्ती।*
*जडली विरक्ती। योग्य मार्गी ।।* ३

*झंकारूनी वीणा । छेडती कर्माला।* 
*पुसती जीवाला। पापपुण्य।।४*

*माथ्यावर माझ्या। तुळस माऊली ।*
*तुझीच साऊली । घरीदारी।। ५*

*अहंभाव गळे। रिंगण करता।*
*फुगडी धरता। जाती भेद।। ६*

*स्मिता म्हणे आता । व्हावी गळाभेट ।*
*अंतरास थेट। पांडूरंगा ।।  ७*

©Smita Raju Dhonsale 🚩 *पंढरीची वारी*🚩 

*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*