Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली ना मला ठोस कारण लागतं, तुला पळभर ही कधी भेटण

हल्ली ना मला ठोस कारण लागतं,
तुला पळभर ही कधी भेटण्यासाठी...
पण मला कोणतं ही कारण पुरतं,
तुझ्यापासून सहज दूर होण्यासाठी...

बघना, हल्ली आपण भांडत नाहीच,
साधे शब्दही नसतात बोलण्यासाठी...
नजर तशी भिरभिरतीच असते ना,
निसटण्याची ती संधी शोधण्यासाठी...

मग मनातल्या भेटीच्या आठवणींचे,
मोठे इमले बांधतो रेखीव कल्पनांचे,
शब्दांचे फटकारे ओढतो त्या सभोवताली,
पांघरतो थोडे उपमांचे अलंकार मखमली...

कोणी सांगावे, कुणा सांगावे, कशासाठी,
झुरलो मनात किती, एक-एक शब्दापाठी...
डोळ्यातली भावना कृत्रिम कागदात विराली,
लोक म्हणाले, "वाह! कविता छान झाली"!— % & #कविता #हल्ली_ना #yq_gns
हल्ली ना मला ठोस कारण लागतं,
तुला पळभर ही कधी भेटण्यासाठी...
पण मला कोणतं ही कारण पुरतं,
तुझ्यापासून सहज दूर होण्यासाठी...

बघना, हल्ली आपण भांडत नाहीच,
साधे शब्दही नसतात बोलण्यासाठी...
नजर तशी भिरभिरतीच असते ना,
निसटण्याची ती संधी शोधण्यासाठी...

मग मनातल्या भेटीच्या आठवणींचे,
मोठे इमले बांधतो रेखीव कल्पनांचे,
शब्दांचे फटकारे ओढतो त्या सभोवताली,
पांघरतो थोडे उपमांचे अलंकार मखमली...

कोणी सांगावे, कुणा सांगावे, कशासाठी,
झुरलो मनात किती, एक-एक शब्दापाठी...
डोळ्यातली भावना कृत्रिम कागदात विराली,
लोक म्हणाले, "वाह! कविता छान झाली"!— % & #कविता #हल्ली_ना #yq_gns