Nojoto: Largest Storytelling Platform

माझे ओठ आई तुझेचं बोल कसे देऊ मी तुझ्या मायेचे मो

माझे ओठ आई तुझेचं बोल 
कसे देऊ मी तुझ्या मायेचे मोल...

आई माझ्या जीवनाचा तू सागर 
भरली तुझ्या मायेनं प्रेमाची घागर 
तुझ्या अंतःकरणात माझं चित्र खोल.....

आई तूझं प्रेम माझ्यासाठी मोती 
तुझ्या मायेसाठी सोडली नातीगोती 
आई तुझ्याचं प्रेमातं हे सारं जग गोल....

आई तू वृक्ष मी आहे तूझं पान 
देवाआधी करतो आई तुझा सन्मान 
देव विसरलो माझ्यासाठी तुचं अनमोल....

आई माझ्यावर तुझेचं संस्कार 
तुझा संगम करेल जगात चमत्कार 
आई तुझ्याचं चरणी जातो माझा तोल....

©Sangam Pipe Line Wala
  #techers