Nojoto: Largest Storytelling Platform

"संयमाचा बांध,आता फोडणार आहे धनुष्यातला बाण, आता स

"संयमाचा बांध,आता फोडणार आहे
धनुष्यातला बाण, आता सोडणार आहे
खूप बोलतो मी, पण काहीच बोलत नाही
इथे हवे स्पष्ट शब्द, डोळे चालत नाही
 मनातलं सगळं आता बडबडणार आहे
संयमाचा बांध आता फोडणार आहे.....
"कितीदा पहावी प्रतीक्षा,मिलनाची तुझ्या 
येशील,का? तूही, धावून, मिठीत माझ्या
मर्यादा साऱ्या आता ओलांडणार आहे
संयमाचा बांध आता फोडणार आहे....
शब्द तुझे,न बघता,तुझे सौंदर्य दावुन गेले
असशील कशी तू ही ओढ लावून गेले
न जाणे अजून किती,मी तडपणार आहे
पण संयमाचा बांध आता फोडणार आहे...
--- योगेश हिवराळे #योगेश#शायरी
"संयमाचा बांध,आता फोडणार आहे
धनुष्यातला बाण, आता सोडणार आहे
खूप बोलतो मी, पण काहीच बोलत नाही
इथे हवे स्पष्ट शब्द, डोळे चालत नाही
 मनातलं सगळं आता बडबडणार आहे
संयमाचा बांध आता फोडणार आहे.....
"कितीदा पहावी प्रतीक्षा,मिलनाची तुझ्या 
येशील,का? तूही, धावून, मिठीत माझ्या
मर्यादा साऱ्या आता ओलांडणार आहे
संयमाचा बांध आता फोडणार आहे....
शब्द तुझे,न बघता,तुझे सौंदर्य दावुन गेले
असशील कशी तू ही ओढ लावून गेले
न जाणे अजून किती,मी तडपणार आहे
पण संयमाचा बांध आता फोडणार आहे...
--- योगेश हिवराळे #योगेश#शायरी