Nojoto: Largest Storytelling Platform

तू शब्द आहे, तू अर्थ आहे, तू आहेस लेखणीची धार नजरे

तू शब्द आहे, तू अर्थ आहे, तू आहेस लेखणीची धार
नजरेने करून वार, करी तू अशी कटाक्षाने घायाळ
तुझा अजोड नखरा, तुझा चेहरा हसरा, अशी तू अलबलेली नार
जाता सहजच नजरे पुढून, अप्सरे तू झनकावे  काळजाची तार,
तू अल्लड, तू मस्तानी, तुझी दिव्यता जणू, तू शुक्राची चांदणी,
तूच् तूच् असतेस सदा माझिया हृदयी अन् ध्यानी मनी,
तुझा आवाज सुरेल, तुझी चाल नखरेल, तुझा तो काय पहावा तोरा..
अग अग सावकाश घे जरा, दमान घे, अजून कितीच् घायाळ करशील ग ह्या पोरा?

©Vaishnavi Pardakhe
  ti