Nojoto: Largest Storytelling Platform

जस जश्या बदलत आहेत तारखा आणि पलटतायेत कॅलेंडरची प

जस जश्या बदलत आहेत तारखा 
आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं
तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून

तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ ...घडून गेलेला
आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे

तो एक क्षण तिथेच आहे का?
की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. 
....अगदी वेगाने 
अगदी जिवाच्या अकांताने

नाही समजत... ही आयुष्याचा शेवटाकडे जाणारी धाव असेल का?

सोडून गेलेल्या बिंदूपासून .....शेवटच्या बिंदूपर्यंत पोहचवणारं...वर्तुळ 

....वसुंधरा जाधव

©vasundhara #वर्तुळ#वसुंधरा जाधव##
#leftalone