Nojoto: Largest Storytelling Platform
vasundhara6341
  • 28Stories
  • 7Followers
  • 189Love
    287Views

Vasundhara Jadhav

poetess

  • Popular
  • Latest
  • Video
b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

माणसाचं मन विशाल सागरासारखं असते. त्याचं त्याचं साचणं असतं, त्याचं त्याचं घुटमळणं असतं, त्याची त्याची वादळं असतात, त्याची त्याची भरती-ओहोटी असते, त्याचा त्याचा विस्तार असतो, त्याची त्याची खोली असते. त्याच्याही खोलवर अंधार  असतो,  त्याचं भरकटणं असतं तर त्याचा किनारा असतो. त्याची त्याची निळाईही असते, त्याच चमकणंही असतं,  त्याचं सामावून घेणंही असतं, त्याच दूर लोटणंही असतं, त्याचे त्याचे  शंख, शिंपले आणि मोतीसुद्धा असतात.  

वसुंधरा जाधव

©Vasundhara Jadhav
  #वसु# मी समुद्र

#वसु# मी समुद्र #मराठीविचार

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

तुझ्या मोकळ्या केसांचं   गच्च आभाळ दाटलं
काठ काजळी गहिरे        त्यात तुफान उठलं

श्वास थांबती मंदसा   झुले मनाचा हिंदोळा
वारा खट्याळ धुंदसा    घन मनाचा सावळा

चाल सावळ्या मनाची    फेर धरती भोवती
लडीवाळ बट तुझी      अशी अधीर सोबती

मुग्ध रेशीमस्पर्श    रोमरोमात फुलती
आडखळणारे ओठ      श्वास निशब्द गुंफती

शब्द मौनाचे लाजरे     रान पिसाट गाठलं
तुझ्यामाझ्यातल्या वेळी    दुर चांदणं सांडलं

वसु

©Vasundhara Jadhav
  # दूर चांदण सांडलं#वसु#

# दूर चांदण सांडलंवसु# #मराठीकविता

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

मी तुझी वाट पाहत आहे........
संध्याकाळच्या रुणझुणणार्‍या वार्‍यासोबत
भुरभरुतायेय केस चेहर्‍यावरून
त्यातूनच झिरपतोय
तिरकस संधिप्रकाश
आणि दिवस-रात्री दरम्यानच्या या विरामाची ही कातरवेळ
आजन्म वाट पाहत असल्याची हुरहुर
आणि आर्त वादळाच काहूर
अस्वस्थ होऊन वेगाने उसळतोय
आकुंचित होऊन मनाचा सागर
उजेड आणि अंधार मिसळतोय
ढळतीय दूरवर तेजाची लकेर
मग सगळं काही शांत होईल
या आभाळाला  शामल रंग चढेल
आणि शांतता नक्कीच येईल
पण आपल्या दोन शरीराला एकत्र बांधलेल्या
आणि एकमेकांना दिलेली नजर
याशिवाय मी शांततेची कल्पनाच करू शकत नाही.
आता तुझ्याशिवाय या अस्थीरतेला स्थैर्य नाही.
तू ये मी तुझी वाट पाहत आहे.


 वसु

©Vasundhara Jadhav
  # मी तुझी वाट पाहत आहे....

#वसुंधरा जाधव

# मी तुझी वाट पाहत आहे.... #वसुंधरा जाधव #मराठीकविता

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile