Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नातील मृत्यू अखंड मौन धारण करुनी देह माझा नि

स्वप्नातील मृत्यू

अखंड मौन धारण करुनी
देह माझा निजला होता
श्र्वासही बंद पाहूनी तेव्हा
आत्मा माझा रडला होता

पाहीन स्वत:ला मृतावस्थेत
विचार कधी केला नव्हता
आहे अजूनी खूप आयुष्य
जगेन नंतर हा भ्रम होता

आक्रोश अनावर पाहून काया
आत्मा तिच्यातून सुटला होता
आठवले ते जगणे तेव्हा
राहिले खूप कळले तेव्हा

माझे माझे तिथेच सगळे
समजत होते स्वतःस वेगळे
काहीच माझे नव्हते जळले
उशीरा झाला तेव्हा कळले

अहंकार मत्सर लोभ धरुनी
क्षण प्रेमाचे बसले गमवून
समाधान दागिना लाख मोलाचा
प्रेम देऊन चेहर्यावरचा

सर्व व्यर्थ नश्वर काया
पर उपकार अमर माया
क्षणात दचकून उठून बसले
ते स्वप्न होते तेव्हा कळले

स्पर्शून स्वत:ला खूप रडले
ते स्वप्न होते तेव्हा कळले
आभार मानिले मग‌ त्या स्वप्नाचे
उरले आयुष्य भरभरुन जगले

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde स्वप्नातील मृत्यू

#Death
स्वप्नातील मृत्यू

अखंड मौन धारण करुनी
देह माझा निजला होता
श्र्वासही बंद पाहूनी तेव्हा
आत्मा माझा रडला होता

पाहीन स्वत:ला मृतावस्थेत
विचार कधी केला नव्हता
आहे अजूनी खूप आयुष्य
जगेन नंतर हा भ्रम होता

आक्रोश अनावर पाहून काया
आत्मा तिच्यातून सुटला होता
आठवले ते जगणे तेव्हा
राहिले खूप कळले तेव्हा

माझे माझे तिथेच सगळे
समजत होते स्वतःस वेगळे
काहीच माझे नव्हते जळले
उशीरा झाला तेव्हा कळले

अहंकार मत्सर लोभ धरुनी
क्षण प्रेमाचे बसले गमवून
समाधान दागिना लाख मोलाचा
प्रेम देऊन चेहर्यावरचा

सर्व व्यर्थ नश्वर काया
पर उपकार अमर माया
क्षणात दचकून उठून बसले
ते स्वप्न होते तेव्हा कळले

स्पर्शून स्वत:ला खूप रडले
ते स्वप्न होते तेव्हा कळले
आभार मानिले मग‌ त्या स्वप्नाचे
उरले आयुष्य भरभरुन जगले

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde स्वप्नातील मृत्यू

#Death

स्वप्नातील मृत्यू #Death #मराठीकविता