Nojoto: Largest Storytelling Platform

गाव ते गाव असतं, जिथे मंजुळ वाहणाऱ्या पाण्याची सरग

गाव ते गाव असतं,
जिथे मंजुळ वाहणाऱ्या पाण्याची सरगम असते,
गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजाची कटकट नसते.
डोंगरामागून अलगद येणाऱ्या सुर्यकिरणांची पहाट असते,
इमारतींमागे लपून बसलेल्या सूर्याला शोधण्याची पहाट नसते.
गाव ते गाव असतं,
जिथे माणसात आपले परके असं भेदभाव नसतं,
गावात येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस असते.
जिथे हंबरणाऱ्या गाईचा आवाज नि कोंबड्याची बांग असते.
कुठे बदकांचा आवाज तर कुठे शेळ्या मेंड्यांच्या कळपांचे वावर असते.
गाव ते गाव असतं,
दूरवर पसरलेली जिथे डोंगर रांग असते,
तर शेतात घाम गाळणाऱ्या बाबांची आरोळी असते.
कितीही राहिलो जरी शहरात तरी,
शहराला  विसरायला लावणारी त्याच्यात ओढ असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

गाव ते गाव असतं...
#गावतेगावअसतं

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.