Nojoto: Largest Storytelling Platform

मन माझे विसरले.... प्रेम आता विरून गेले घाव सारे

मन माझे विसरले.... 

प्रेम आता विरून गेले
घाव सारे बरे झाले
मन माझे कसे बरे
तुला अचानक विसरून गेले!

तुझ्या सुंदरतेचे गीत गायचो
तुझ्या रूपाचे स्मीत पहायचो 
तुझ्या प्रत्येक स्मृती मधूनी
रोज नवे मी गीत गायचो !

आता पाहता, तुला मला 
सुंदरता तरी दिसत नाही
तुझ्या रूपाचे स्मीत पहता
गीत मला तरी सुचतं नाही !

कसे बदलले नेत्र माझे
कोणी बदलले सूत्र मनाचे 
कुरूपता तुझ्या या रूपा मधली
आज कशी ही दिसू लागली !

प्रेम जिरले,
पूर्ण विरले,
शेवटी सखे,
मन माझे,
तूला विसरले ! मन माझे विसरले
#love
मन माझे विसरले.... 

प्रेम आता विरून गेले
घाव सारे बरे झाले
मन माझे कसे बरे
तुला अचानक विसरून गेले!

तुझ्या सुंदरतेचे गीत गायचो
तुझ्या रूपाचे स्मीत पहायचो 
तुझ्या प्रत्येक स्मृती मधूनी
रोज नवे मी गीत गायचो !

आता पाहता, तुला मला 
सुंदरता तरी दिसत नाही
तुझ्या रूपाचे स्मीत पहता
गीत मला तरी सुचतं नाही !

कसे बदलले नेत्र माझे
कोणी बदलले सूत्र मनाचे 
कुरूपता तुझ्या या रूपा मधली
आज कशी ही दिसू लागली !

प्रेम जिरले,
पूर्ण विरले,
शेवटी सखे,
मन माझे,
तूला विसरले ! मन माझे विसरले
#love