तिथे एक पाऊस तुझ्या दाराशी घुटमळत बसलाय, इथे एक पाऊस माझ्या नभापाशी अडखळत रुसलाय... घेऊन ये तुझा पाऊस अन् माझं आभाळ भरून दे, कोरड्या मनाला जरा ओलाव्याची सोय करून दे, नाहीच जमलं येण्यास तर हरकत नसावी, पावसात तुझ्या माझी फक्त एक आठवण असावी, पावसाला असे चौकटीत बांधणे बरे नव्हे ना, फक्त इथेच बरस असे सांगणे बरे नव्हे ना, तुझा रहावा की माझा नको, यातच बघ तो फसलाय, तिथे एक पाऊस तुझ्या दाराशी घुटमळत बसलाय, इथे एक पाऊस माझ्या नभापाशी अडखळत रुसलाय.... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #CloudyNight