Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र मुक्त चांदण्याची ओढ उरी मिलनाची काहूर दाटे

रात्र मुक्त चांदण्याची
ओढ उरी मिलनाची
काहूर दाटे  पुसल्या मनी
आस स्पर्श वेढण्याची

ज्योत मालवूनी चांदव्याची 
आता भुलावणी समीराची 
तनु वेल केविलवाणी ती 
शोधीत आधार देहतरुची

रानी माळ त्या काजव्यांची 
स्पर्श करता ,आस रिक्तस्मानाची
आता नको दुरावे ,नको पुरावे 
आर्जव आता तव बाहू पाकळीत मिटण्याची
 ##मनस्वी स्पंदने     
  (पल्लवी) फडणीस,भोर✍🏻
शब्दार्थ- पुसलेल्या- हरविलेल्या

©Pallavi Phadnis